'कोकण हार्टेड गर्ल'नंतर 'बिग बॉस मराठी'मधील आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
By तेजल गावडे | Updated: February 18, 2025 18:27 IST2025-02-18T18:26:06+5:302025-02-18T18:27:06+5:30
नुकतेच बिग बॉस मराठी ५मधून घराघरात पोहचलेली सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर अंकिता प्रभू वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्न केले आहे. त्यानंतर आता 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली अभिनेत्रीदेखील विवाहबंधनात अडकली आहे.

'कोकण हार्टेड गर्ल'नंतर 'बिग बॉस मराठी'मधील आणखी एका अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ, फोटो आले समोर
नुकतेच बिग बॉस मराठी ५मधून घराघरात पोहचलेली सोशल मीडिया इन्फ्ल्युन्सर अंकिता प्रभु वालावलकरने बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्न केले आहे. त्यानंतर आता 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झालेली मिनल शाह (Meenal Shah)देखील विवाहबंधनात अडकली आहे. तिने तथागत पुरुषोत्तमसोबत गोव्यात लग्नगाठ बांधली आहे.
मिनल शाहने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर करत चाहत्यांना खुशखबर दिली आहे. तिने गोव्यातील तिच्या बंगल्यात तथागत पुरषोत्तमसोबत लग्नगाठ बांधली आहे. तिने सोशल मीडियावर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. तिने नारंगी रंगाची नववारी साडी नेसली आहे. पारंपारिक वेशात ती खूपच सुंदर दिसते आहे.
तिने फोटो शेअर करत लिहिले की, आय लव्ह यू तथागत. प्रियजनांकडून मिळालेल्या प्रेम आणि आशीर्वादांबद्दल धन्यवाद. मला खूप काही सांगायचे आहे पण ही भावना शब्दात व्यक्त करू शकत नाही. तिच्या या फोटोवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. या लग्नाला बिग बॉस मराठी फेम सोनाली पाटीलने हजेरी लावली होती. तीदेखील या फोटोत पाहायला मिळत आहे.
मिनल शाह 'बिग बॉस मराठी'च्या तिसऱ्या पर्वात सहभागी झाली होती. तिला या शोमधून चांगलीच लोकप्रियता मिळाली. या पर्वातील टॉप ५ स्पर्धकांमध्ये मिनलने स्थान मिळवले होते. शिवाय ‘एमटीव्ही रोडीज’ या रिअॅलिटी शोमध्येही ती झळकली होती. मिनल शाहने २०२४च्या दिवाळीच्या शुभमुहूर्तावर गोव्यामध्ये नवीन घरात प्रवेश केला होता. याच घरात तिचा लग्नसोहळा पार पडला आहे.