दिवंगत अभिनेता सुशांतनंतर आता 'या' लोकप्रिय अभिनेत्यानेही खरेदी केली चंद्रावर जमीन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2024 12:48 PM2024-07-23T12:48:04+5:302024-07-23T12:48:51+5:30

सुशांतनंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्यानं चंद्रापर्यंतची मजल गाठली आहे.

After late actor Sushant Singh Rajput popular actor sai ketan rao bought land on Moon | दिवंगत अभिनेता सुशांतनंतर आता 'या' लोकप्रिय अभिनेत्यानेही खरेदी केली चंद्रावर जमीन

दिवंगत अभिनेता सुशांतनंतर आता 'या' लोकप्रिय अभिनेत्यानेही खरेदी केली चंद्रावर जमीन

आता चंदामामा दूर का राहिला नाही. चंद्रावर मानवाने चढाई केली आहे. अमेरिकन अंतराळवीर तर चंद्रावर पोहचलेले आहेत. चंद्रावर रिअल इस्टेट यापूर्वीच सुरु झाली आहे. चंद्राच्या जमिनीवर अनेकांचा डोळा आहे. चंद्रावर जमीन खरेदी करण्यासाठी अनेकांमध्ये शर्यत लागलेली आहे. जगातीलच नाही तर देशातील काही जणांनी चंद्रावर जमीन खरेदी केली आहे.  यामध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचादेखील समावेश होता. सुशांतने चंद्रावर चक्क जमीन खरेदी केली होती. आता सुशांतनंतर आणखी एका लोकप्रिय अभिनेत्यानं चंद्रापर्यंतची मजल गाठली आहे.

आता 'बिग बॉस ओटीटी 3' स्पर्धक साई केतन रावने चंद्रावर जमीन खरेदी केली आहे. 21 जुलैच्या एपिसोडमध्ये सना सुलतानशी बोलताना त्याने हा खुलासा केला. त्याने चंद्रावर जमीन का खरेदी केली असा प्रश्न सनाने त्याला विचारला असता  "शौक बड़ी चीज है" असं उत्तर त्यानं दिलं.  साई केतन राव हा 'बिग बॉस ओटीटी 3' चा एक मजबूत स्पर्धक आहे. 

साई केतन रावने कॉम्प्युटर सायन्समध्ये बीटेक केले आणि त्यानंतर एमबीएची पदवी मिळवली. शिक्षणानंतर त्याने एका ऑस्ट्रेलियन कंपनीत काम करायला सुरुवात केली होती. पण त्याला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. यासाठी त्याने रामनायडू फिल्म स्कूलमध्ये प्रवेश घेतला. थिएटर आर्ट्स पूर्ण केल्यानंतर त्याने आपल्या अभिनय कारकीर्दीला सुरुवात केली होती. शॉर्ट फिल्ममध्ये काम केल्यानंतर त्याने टेलिव्हिजनमध्ये एन्ट्री घेतली. 'मेहंदी है रचने वाली' मालिकेती त्याच्या पात्राला प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम दिलं होतं. त्यानंतर तो 'चाशनी' आणि  'इमली' शोमध्ये दिसला होता. 

दरम्यान, चंद्रावरची अशी जमीनखरेदी ही कायदेशीर मालकीची नसते. कारण आंतरराष्ट्रीय करारानुसार, अवकाशाबाहेरील खगोलीय वस्तू, जागा या मानवाच्या सामायिक वारसा आहेत. त्यांच्यावर कोणा एका देशाचा हक्क असू शकत नाही. 1967 मधील आऊटर स्पेस ट्रीटीनुसार चंद्रावरील जमिनीवर कोणत्याही एका देशाचा अधिकार नाही. या करारावर जगातील 110 देशांनी हस्ताक्षर केले आहेत. ब्रह्मांड संपूर्ण मानवाचे आहे. ग्रह-उपग्रहावरील जमिनीवरील मालकी हक्क एका व्यक्तीला देता येणार नाही.

Web Title: After late actor Sushant Singh Rajput popular actor sai ketan rao bought land on Moon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.