साईशा भोईरला 'रंग माझा वेगळा' सोडल्यानंतर लागली लॉटरी, नव्या मालिकेशिवाय या प्रोजेक्टमध्ये लागली वर्णी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2022 05:46 PM2022-07-11T17:46:06+5:302022-07-11T17:46:35+5:30
Saisha bhoir: 'रंग माझा वेगळा' या मालिकेत साईशाने, कार्तिकीची भूमिका साकारली होती. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला होता. मात्र, मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाच तिने ही मालिका सोडली.
स्टार प्रवाह(Star Pravah)वरील लोकप्रिय मालिका रंग माझा वेगळा(Rang Maza Vegla)ने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत कार्तिकीची भूमिका साकारणारी बालकलाकार साईशा भोईर (Saisha Bhoir) घराघरात पोहचली आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर असताना तिने ही मालिका सोडली आहे. त्यामुळे तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला होता. मात्र आता ती लवकरच झी मराठी वाहिनीवरील नवीन मालिका नवा गडी नवं राज्यमध्ये दिसणार आहे. दरम्यान या मालिकेशिवाय ती आणखी काही प्रोजेक्टमध्ये काम करताना दिसणार आहे.
साईशा भोईर सोशल मीडियावर सक्रीय असून ती फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. इतकेच नाही तर ती या माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. तिने रंग माझा वेगळा मालिका सोडण्यामागचे कारणदेखील इंस्टाग्रामवर लाइव्ह येऊन सांगितले होते. त्यानंतर आता पुन्हा एकदा चाहत्यांशी गप्पा मारताना तिने तिच्या आगामी प्रोजेक्टबद्दल आणि नवीन मालिका स्वीकारण्यामागचे कारण सांगितले आहे.
सोशल मीडियावर एका चाहत्याने विचारले की, फक्त मराठी मालिका आहेत का शेड्युलमध्ये. त्यावर साईशाने उत्तर देताना सांगितले की, एक सिनेमा, एक वेबसीरिज आणि दोन जाहिरात आहेत. या नवीन प्रोजेक्टबद्दल लवकरच समजेल सर्वांना. मात्र आता तुमचे माझ्यावरील प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू दे.
तसेच एका आणखी एका युजरने लिहिले की, सगळ्यांना माहित आहे साईशा खूप मेहनती आहे. तिला नवीन प्रोजेक्टमध्ये इंटरेस्ट होता का?, त्यावर उत्तरात लिहिले की, कोणतीही गोष्ट जी महत्त्वाची आहे आणि जी गोष्ट कोणत्याही प्रोजेक्ट पेक्षा किंवा कोणत्याही गोष्टीपेक्षा महत्त्वाची आहे ती म्हणजे साईशाचं आरोग्य, तिचं शिक्षण, तिची शाळा आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा प्रवास. तिचे सर्व नवीन प्रोजेक्ट शूटचे लोकेशन. घरापासून शूट लोकेशनपर्यंतच्या प्रवासाचा कालावधी, तिची शाळा, तिचे शिक्षण या गोष्टी विचारात घेऊन निवडले जातात. तिच्या आगामी नवीन प्रोजेक्टमध्ये तिला आठवड्याच्या दिवसात शाळेत जाण्याची परवानगी आहे आणि तिचे शूट फक्त आठवड्याच्या शेवटी होईल जे तिच्या मागील प्रोजेक्टच्या बाबतीत नव्हते.