अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं स्वत:लाच मारून घेतलं...! जुना व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 15:00 IST2021-04-11T14:59:55+5:302021-04-11T15:00:34+5:30
Neha Kakkar's Throwback Video : विश्वास बसणार नाही, पण आज नेहा ज्या शोची जज आहे, त्याच शोच्या दुस-या सीझनमध्ये नेहाचे गाणे ऐकून अनु मलिक यांनी स्वत:लाच मारून घेतलं होतं.

अन् नेहा कक्करचं गाणं ऐकून अनु मलिकनं स्वत:लाच मारून घेतलं...! जुना व्हिडीओ पाहून व्हाल थक्क
नेहा कक्कर (Neha Kakkar) बॉलिवूड इंडस्ट्रीतील मोठे नाव. तिच्या गाण्यांवर आज अख्खी तरूणाई थिरकते. ‘इंडियन आयडल’ सारख्या मोठ्या रिअॅलिटी शोची जज म्हणून मिरवणा-या याच नेहाचा एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. विश्वास बसणार नाही, पण आज नेहा ज्या शोची जज आहे, त्याच शोच्या दुस-या सीझनमध्ये नेहाचे गाणे ऐकून अनु मलिक (Anu Malik) यांनी स्वत:लाच मारून घेतलं होतं. (After listening to Neha Kakkar's singing; Anu Malik wanted to slap himself)
तर हा व्हिडीओ आहे, इंडियन आयडलच्या दुस-या सीझनचा. या सीझनमध्ये नेहा कंटेस्टंट म्हणून सहभागी झाली होती. आॅडिशनमध्ये नेहा ‘ऐसा लगता है....,’ हे रोमॅन्टिक सॉन्ग गाताना दिसतेय. सोनू निगम, फराह खान आणि अनू मलिक ऑडिशन राऊंडमध्ये जजच्या खुर्चीवर बसले आहेत. व्हिडीओत नेहा परफॉर्म करते आणि तिचे गाणे ऐकून अनु मलिक यांचा राग अनावर होतो.
जब नेहा कक्कड़ का गाना सुन कर अनु मलिक ने मारा अपने आप को थप्पड़😂😂 pic.twitter.com/aHSSbN7tWw
— मंदोदरी (@Mrs_Raavan_) April 9, 2021
नेहाला मध्येच रोखत, ते तिला फटकारतात. नेहा कक्कर, तेरी आवाज सुनकर लगता है, मैं अपने मुंह पर मारूं थप्पड... यार क्या हो गया है तेरे को... असे ते म्हणतात. ते केवळ म्हणत नाही तर स्वत:च्या हाताने स्वत:च्याच गालावर थप्पडही मारून घेतात. अनु मलिक यांची ही प्रतिक्रिया पाहून नेहा प्रचंड नर्व्हस होते आणि विचित्र नजरेने जजेसकडे बघायला लागते.
नेहाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे. ‘इंडियन आयडल 2’मध्ये अनु मलिक यांच्याकडून अशा लाजीरवाण्या प्रकाराला सामोरे जाणारी हीच नेहा आज ‘इंडियन आयडल 12’ची जज आहे. इतकेच नाही तर यापूर्वीच्या सीझनमध्ये अनु मलिक यांच्यासोबतही हा शो जज करताना ती दिसली आहे.