Indian Idol 14मधील स्पर्धकाचं गाणं ऐकून करीश्मा झाली भावुक, कॅमेरासमोरच रडली
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2023 15:33 IST2023-11-25T15:30:36+5:302023-11-25T15:33:27+5:30
शोमधील एका स्पर्धकाचे गाणं ऐकून करिश्मा कपूर भावूक झाली आणि तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

Indian Idol 14मधील स्पर्धकाचं गाणं ऐकून करीश्मा झाली भावुक, कॅमेरासमोरच रडली
सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल 14' सध्या छोट्या पडद्यावर चर्चेत आहे. शोचे स्पर्धक त्यांच्या गायकीने जज आणि प्रेक्षकांची मनं जिंकतायेत. 'इंडियन आयडॉल 14' च्या मंचावर दर आठवड्याला स्पर्धकांचा उत्साह वाढवण्यासाठी सेलिब्रेटी गेस्ट येत असतात. लेसेस्ट एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे या अभिनेत्री करिश्मा कपूरने या शोमध्ये हजेरी लावलेली दिसतेय. शोमधील एका स्पर्धकाचे गाणं ऐकून करिश्मा कपूर भावूक झाली आणि तिचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
सोनी टीव्हीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'इंडियन आयडॉल 14' चा प्रोमो व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. शोची स्पर्धक महिमा भट्टाचार्जीनं राज कपूर यांच्या 'मेरा नाम जोकर' चित्रपटातील 'जीना यहाँ मरना यहाँ, इसे सिवा जाना कहां' हे गाणे गायले आहे. हे गाणे ऐकून करिश्मा कपूर भावूक झाली. करिश्मा कपूरला तिच्या आजोबांचा राज कपूर यांची आठवण आली. ती म्हणाली, आज आम्ही जे काही आहोत, यासाठी त्यांचे आभारी आहोत. करिश्मा कपूरला रडायताना पाहून कार्यक्रमाचे जज आणि स्पर्धकही भावूक झाले.
करिश्मा कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री बऱ्याच दिवसांपासून अभिनयाच्या जगापासून दूर आहे. तो शेवटचा मेंटलहुड या वेब सीरिजमध्ये दिसला होता. आता करिश्मा होमी अदजानियाच्या मर्डर मुबारकमध्ये दिसणार आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत सारा अली खान देखील असणार आहे. याशिवाय अभिनेत्रीकडे अभय देवसची ब्राउन ही वेबसीरिज देखील आहे.