'माझी तुझी रेशीमगाठ' पाठोपाठ झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 11:31 AM2023-03-04T11:31:04+5:302023-03-04T11:44:30+5:30

माझी तुझी रेशमगाठ मालिकेने अलिकडेच प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. त्यानंतर आता झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका संपणार आहे.

After Mazhi Tuzhi Reshimgath on zee marathi this serial goes off air soon | 'माझी तुझी रेशीमगाठ' पाठोपाठ झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

'माझी तुझी रेशीमगाठ' पाठोपाठ झी मराठीवरील आणखी एक प्रसिद्ध मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप

googlenewsNext

झी मराठी (Zee Marathi)वरील प्रत्येक मालिकेने प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केले आहे. झी मराठीवर (Zee Marathi) अलीकडेच अनेक मालिका सुरू आहेत. पण मालिका आता अखेरच्या टप्प्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकरच एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. काही दिवसांपूर्वीच 'माझी तुझी रेशीमगाठ' या प्रसिद्ध मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. त्यानंतर आणखी एक प्रसिद्ध मालिके प्रेक्षकांच्या निरोप घेण्याच्या तयारीत आहे. 

झी मराठी वाहिनीने अलिकडेच त्यांच्या सोशल मिडियावरुन नव्या मालिकेची घोषणा केली. तुला शिकवीन चांगलाच धडा’ या मलिकेचा टिझर  रिलीज झाला आहे. या मालिकेत कविता लाड, शिवानी रांगोळे आणि  हृषिकेश शेलार यात मुख्य भूमिकेत दिसतायेत. 

नवी मालिका येणार म्हटलं की तीची वेळ काय असेल, कोणत्या मालिकेच्या जागी ही मालिका येईल अर्थात कोणती मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असे एक ना अनेक प्रश्न पडतात.  

सौरभ आणि अनामिकाची ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. वयाच्या चाळीशीत पुन्हा प्रेमात पडलेल्या स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरची ऑन स्क्रीन जोडी प्रेक्षकांनाही भावली. स्वप्नील जोशी व शिल्पा तुळसकरसह या मालिकेत अभिज्ञा भावे, सुहास जोशी, रुमाणी खरे या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘तू तेव्हा तशी’ ही मालिका रात्री ८ वाजता प्रसारित व्हायची. आता या मालिकेच्या जागी ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही नवी मालिका सुरू होणार आहे. 

Web Title: After Mazhi Tuzhi Reshimgath on zee marathi this serial goes off air soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.