मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिषनंतर आता सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका कपलनं दिली नात्याची कबुली, लवकरच बांधणार लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2023 02:00 PM2023-07-22T14:00:14+5:302023-07-22T14:00:54+5:30

बिग बॉस मराठीच्या घरात झळकलेले हे कपल यावर्षी लग्नगाठ बांधणार आहे.

After Mugdha-Prathmesh, Swanandi-Ashish, now another couple in the cine industry has confessed their relationship and will tie the knot soon. | मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिषनंतर आता सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका कपलनं दिली नात्याची कबुली, लवकरच बांधणार लग्नगाठ

मुग्धा-प्रथमेश, स्वानंदी-आशिषनंतर आता सिनेइंडस्ट्रीतील आणखी एका कपलनं दिली नात्याची कबुली, लवकरच बांधणार लग्नगाठ

googlenewsNext

मराठी सिनेसृष्टीत सध्या प्रेमाचे वारे वाहताना दिसत आहेत. कुणी लग्नगाठ बांधत आहे तर कुणी एंगेजमेंट करत आहेत तर कुणी नात्याची कबुली देत आहे. सा रे ग म प लिटिल चॅम्प्समधील मोदक आणि मॉनिटर म्हणजे प्रथमेश लघाटे (Prathamesh Laghate) आणि मुग्धा वैशंपायन (Mugdha Vaishampayan) यांनी आमचं ठरलं म्हणत सोशल मीडियावर नात्याची कबुली दिली होती. त्यानंतर नुकतीच दिल दोस्ती दुनियादारी मालिकेतील अभिनेत्री स्वानंदी टिकेकर(Swanandi Tikekar)ने देखील सोशल मीडियावर इंडियन आयडॉल १२ फेम आशिष कुलकर्णी(Aashish Kulkarni)सोबत नात्यात असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचा लवकरच साखरपुडा पार पडणार आहे. दरम्यान आता आणखी एका सेलिब्रेटी कपलने सोशल मीडियावर नात्याची कबुली देत लग्नाची तारीख शेअर केली आहे. हे कपल म्हणजे अभिनेता प्रसाद जवादे (Prasad Jawade)आणि अभिनेत्री अमृता देशमुख (Amruta Deshmukh).

अभिनेत्री अमृता देशमुख हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत प्रसाद जवादेसोबत रिलेशनशीपमध्ये असल्याचे जाहीर केले. तिने लिहिले की, आम्ही एंगेज आहोत. आम्ही अधिकृतपणे कायमस्वरूपी टीम मेंबर म्हणून एकमेकांना नामनिर्देशित करत आहोत आणि आमच्या मार्गात येणाऱ्या कोणत्याही कार्याला सामोरे जाण्यासाठी आम्ही तयार आहोत. अमृताने शेअर केलेल्या तीन फोटोंपैकी पहिल्या फोटोत तिने एंगेजमेंट रिंग दाखवत एंगेजमेंट झाल्याचे सांगितले. याच फोटोत तिने लग्नाची तारीखदेखील सांगितली आहे. प्रसाद आणि अमृता १८ नोव्हेंबर, २०२३ ला लग्नगाठ बांधणार आहेत. 


अमृता देशमुखच्या या फोटोवर चाहते लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. प्रसाद आणि अमृता बिग बॉस मराठीच्या घरात एकमेकांना पहिल्यांदा भेटले आणि त्यांच्या केमिस्ट्रीने सर्वांची मने जिंकली. मात्र शो संपल्यानंतरही दोघांनी एकमेकांसोबत राहण्याचा निर्णय घेतला. ते दोघे सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करत असतात आणि त्यांच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे. 

Web Title: After Mugdha-Prathmesh, Swanandi-Ashish, now another couple in the cine industry has confessed their relationship and will tie the knot soon.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.