'नवा गडी नवं राज्य'नंतर वर्षा दांदळेंची 'सुंदरी' मालिकेत एन्ट्री, साकारणार ही भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 06:18 PM2024-03-01T18:18:40+5:302024-03-01T18:19:11+5:30

Varsha Dandale : अनेक मराठी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांची ‘सुंदरी’मध्ये नवीन एंट्री होणार आहे.

After 'Nava Gadi Nava Rajya', Varsha Dandale's entry in 'Sundari' series, will play this role | 'नवा गडी नवं राज्य'नंतर वर्षा दांदळेंची 'सुंदरी' मालिकेत एन्ट्री, साकारणार ही भूमिका

'नवा गडी नवं राज्य'नंतर वर्षा दांदळेंची 'सुंदरी' मालिकेत एन्ट्री, साकारणार ही भूमिका

सन मराठीच्या ‘सुंदरी’ (Sundari) मालिकेत एका मागोमाग एक अनपेक्षित घटना घडत आहेत. त्यामुळे प्रेक्षकही अतिशय मन लावून, कथेत रस घेऊन न चुकता ही मालिका पाहतात. प्रेक्षक या मालिकेच्या प्रत्येक एपिसोडसोबत जोडलेले आहेत हे त्यांच्या सोशल मिडीयाच्या कॉमेंट्सवरुन लक्षात येते. नुकतीच या मालिकेतून अनू आणि साहेब या दोन पात्रांची एक्झिट झाली आहे. दरम्यान आता या मालिकेत 'नवा गडी नवं राज्य' फेम अभिनेत्री वर्षा दांदळे दिसणार आहेत.

नुकतीच ‘सुंदरी’ या मालिकेत अनू आणि साहेब या दोन पात्रांची एक्झिट झाली आहे. आता पुढे काय, असा विचार अनेकांनी केलाच असेल आणि तेवढ्यात या मालिकेत नवीन एंट्री लगेच दिसून येते. अनेक मराठी मालिकेत महत्त्वाच्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री वर्षा दांदळे यांची ‘सुंदरी’मध्ये नवीन एंट्री होणार आहे. वर्षा दांदळे साकारत असलेल्या पात्राच्या येण्यामुळे सुंदरीच्या आयुष्यात नेमकं काय बदल घडणार, त्यांच्या येण्याने सुंदरीचं आयुष्य सुरळित चालू राहणार की नवीन अडथळे निर्माण होणार या सर्व प्रश्नांची उत्तरं प्रेक्षकांना लवकरच मिळतील. 

वर्कफ्रंट
वर्षा दांदळे यांनी पाहिले नं मी तुला या मालिकेत काम केले आहे. त्याबरोबर त्यांनी ‘नांदा सौख्यभरे’ या मालिकेत वच्छी आत्या ही भूमिका केली होती. याशिवाय वर्षा यांनी एकाच या जन्मी जणू, आनंदी हे जग सारे यांसारख्या अनेक मालिकांमध्ये तसेच नाटकांमध्ये ही काम केले आहे. अभिनयाबरोबरच वर्षा यांनी सवेरेंवाली गाडी या नाटकाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. 

Web Title: After 'Nava Gadi Nava Rajya', Varsha Dandale's entry in 'Sundari' series, will play this role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.