'या' कॉमेडियनेही सोडली कपिलची साथ,'हे' आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 09:40 AM2019-03-07T09:40:34+5:302019-03-07T09:40:55+5:30
गेल्या वर्षी कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. तेव्हाही तो शोमध्ये झळकत नव्हता. मात्र कपिल सोबतच्या मैत्रीखातर त्याने पुन्हा शोमध्ये एंट्री केली होती.
गेल्या काही दिवसांपासून 'कपिल शर्मा शो' वादाच्या भोव-यात अडकला आहे. त्यातच आणखी एका सदस्याने कपिलची साथ सोडली असल्याचे बोलले जात आहे. हा सदस्य म्हणजे चंदू चायवाले हे पात्र साकाराणारा चंदन प्रभाकर. गेल्या काही दिवसांपासून चंदन प्रभाकरचे या शोमध्ये दर्शन घडत नाही. तो व्हॅकेशनवर असल्याच्या चर्चा होत्या. मात्र असे काही नसून मेकर्सनेच त्याला दुर्लक्षित केल्याची माहिती मिळते. खुद्द चंदन प्रभाकरनेच या गोष्टीचा खुलासा केला आहे. या शोसाठी माझी गरज संपली आहे. त्यामुळे मी साकारत असलेले पात्र आता मेकर्सना जास्त महत्त्वाचे वाटत नाही.
वास्तविक कपिल आणि चंदन ब-याचशा कालावधीपासून एकत्र काम करत आहेत. त्यामुळेच त्यांच्यातील मैत्री सर्वश्रृत आहे. लाफ्टर चॅलेंजसारख्या प्रसिद्ध शोमध्ये या दोघांमधील जुंगलबंदी प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन करीत असे. तेव्हापासून एकत्र काम करत असलेल्या या मित्रांमध्ये आता दूरावा निर्माण झाला आहे. गेल्या वर्षी कपिलसोबतच्या मतभेदामुळे चंदन खूपच डिस्ट्रर्ब झाला होता. तेव्हाही तो शोमध्ये झळकत नव्हता. मात्र कपिल सोबतच्या मैत्रीखातर त्याने पुन्हा शोमध्ये एंट्री केली होती.
नवज्योत सिंग सिद्धू यांना ‘द कपिल शर्मा शो’ परत आणण्याची तयारी?
दहशतवादास धर्म नसतो, देश नसतो. पाकिस्तानशी चर्चा करून तोडगा काढावा, अशा मवाळ भाषेत पाकिस्तानची पाठराखण करून माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेता नवज्योत सिंग सिद्धू वादात सापडले आणि द कपिल शर्मा शोमधून त्यांना बाहेरचा रस्ता दाखवला गेला. त्याच्या जागी या शोमध्ये अर्चना पूरण सिंगची वर्णी लागली. पण आता सिद्धूला ‘द कपिल शर्मा शो’मध्ये परत आणण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. ‘द कपिल शर्मा शो’चा निर्माता सलमान खान यासाठी प्रकरण शांत होण्याची प्रतीक्षा करतोय.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची भावना असताना या हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना, सिद्धू यांनी पाकिस्तानची पाठराखण करणारे वक्तव्य केले होते. काही लोकांच्या कृत्यासाठी संपूर्ण देशाला जबाबदार ठरवले जाऊ शकते का? हा हल्ला भ्याड होता. मी या हल्ल्याची निंदा करतो. पण ज्यांनी हा हल्ला केला त्यांना या कृत्याची शिक्षा मिळायला हवी, असे सिद्धू म्हणाले होते.