'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2019 15:50 IST2019-08-13T15:49:51+5:302019-08-13T15:50:34+5:30
'माझ्या नवऱ्याची बायको' मालिकेतील कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री जमली असून सेटवर हे कलाकार खूप धमालमस्ती करत असतात.

'माझ्या नवऱ्याची बायको'मधील कलाकार पॅकअपनंतर एकत्र असतील तर करतात ही गोष्ट
झी मराठी वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'माझ्या नवऱ्याची बायको'ला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ही मालिका बऱ्याच वर्षांपासून सुरू असून अद्याप ही मालिका प्रेक्षकांचे मन जिंकत आहेत. या मालिकेतील कलाकारांमध्ये खूप चांगली मैत्री जमली असून सेटवर हे कलाकार खूप धमालमस्ती करत असतात. बऱ्याचदा ते सोशल मीडियावर फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. नुकताच या मालिकेतील जेनी हिने इंस्टाग्राम अकाउंटवर व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ एका कॅफेतील असून तिथे या मालिकेतील कलाकार पहायला मिळत आहेत.
जिनी म्हणजेच शर्मिला राजाराम शिंदे हिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ पहायला मिळतो आहे. या व्हिडिओत अनिता दाते, शर्मिला राजाराम, निशित राजदा आणि इतर काही कलाकार मिळून पॅकअपनंतर कॅफेमध्ये गेले.
अनिताने हा व्हिडीओ शूट केला असून यामध्ये सर्व कलाकार एन्जॉय करताना दिसत आहेत. या व्हिडिओ शेअर करून लिहिलं की, पॅकअपनंतर आम्ही जर सगळे एकत्र असलो तर संपूर्ण दिवस कॅफे किंवा रेस्टॉरंटमध्ये व्यतित करतो.
‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकेबद्दल सांगायचं तर सध्या मालिकेत रंजक वळण आलं आहे.
राधिका सौमित्रला लग्नासाठी होकार देते. लग्नाची वेळही ठरते. पण हे लग्न थांबण्याची शक्यता गुरूमुळे वाढते. त्यामुळे राधिका सौमित्रसोबत लग्न करते का? या लग्नात गुरूनाथ काही व्यत्यय आणतो का? हे मालिकेचा आगामी भाग पाहिल्यावर समजेल.