प्रार्थना बेहेरनंतर या मराठमोळ्या अभिनेत्रीने सुरु केला स्वत:चा व्यवसाय, अभिनंदनाचा होतोय तिच्यावर वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 03:56 PM2023-10-17T15:56:38+5:302023-10-17T15:58:50+5:30
गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात उतरले आहेत.
कलाविश्वात असे अनेक कलाकार आहेत जे अभिनयक्षेत्रासह अन्य बऱ्याच क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत. गेल्या काही महिन्यात अनेक मराठी कलाकार वेगवेगळ्या व्यवसायात उतरले आहेत. तेजस्विनी पंडित, अभिज्ञा भावे, प्राजक्ता माळी, अक्षया नाईक, प्रार्थना बेहरे, अनघा भगरे यांसारख्या अनेक अभिनेत्रींनीं अभिनयाबरोबरच स्वत:चा व्यवसाय सुरु केला आहे. यात लिस्टमध्ये आता आणखी एका अभिनेत्रीचा नाव सामील झालं आहे.
बिग बॉस मराठी मधील एका अभिनेत्रीने स्वतःची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली आहे. या कंपनीद्वारे ती अनेक कार्यक्रमाचं आयोजन व नियोजन करणार आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली.
ही अभिनेत्री म्हणजे मीरा मीरा जगन्नाथ. मीरा ही मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. 'बिग बॉस मराठी'मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या मीराने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. मीराचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे.
मीराने इंस्टाग्राम पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की, ‘उत्कृष्ट व सुंदर गाण्यांच्या जादूचा अनुभव घ्या असं म्हणत माझ्या ‘मीरामी’ मीडिया द्वारे लवकरच उत्तम, दर्जेदार कार्यक्रम तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आत्तापर्यंत माझ्या सर्व कलाकृतींना तुम्ही जी मोलाची साथ दिलीत तिच साथ यापुढेही देत राहाल अशी आशा. तुमच्या लाडक्या मीरा जगन्नाथच्या ‘मिरामी’ला सुद्धा असंच कायम प्रेम देत रहा.’
'येऊ कशी तशी मी नांदायला' या मालिकेतून मीरा घराघरात पोहोचली. या मालिकेत तिने मोमो हे पात्र साकारलं होतं. त्यानंतर मीरा 'ठरलं तर मग' मालिकेत दिसली होती.