राहुल महाजननंतर आणखी एक अभिनेत्री घेणार घटस्फोट, म्हणाली-खूप विचार केल्यानंतर....
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 02:13 PM2023-08-01T14:13:22+5:302023-08-01T14:21:39+5:30
राहुल महाजननंतर आणखी एक अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे.
राहुल महाजननंतर आणखी एक अभिनेत्रीच्या घटस्फोटाची बातमी समोर आली आहे. काल ३१ जुलैला राहुल महाजनच्या तिसऱ्या घटस्फोटाची बातमी ऐकून सगळ्यांना धक्का बसला होता. यानंतर आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री तिच्या पतीपासून विभक्त होणार असल्याचं समजतंय. सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने याची घोषणा केली आहे.
क्या हाल मिस्टर पांचाल’ फेम अभिनेत्री श्रुती रावत पती निखिल आगवणेपासून विभक्त होत आहे. श्रुतीने तिच्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली. अभिनेत्री म्हणाली तिने आणि तिच्या पतीने आयुष्यात पुढे जाण्याचा आणि स्वतःच्या मार्गावर जाण्याचा एक कठीण निर्णय घेतला आहे.
श्रुतीने इन्स्टाग्रामवर लिहिले आहे की, "खूप विचार केल्यानंतर, निखिल आणि मी पती-पत्नी म्हणून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या-आपल्या मार्गाने पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही भाग्यवान आहोत की आमच्यात जवळपास एक दशक मैत्री आहे. हा आमच्या नात्याचा गाभा आहे आणि आम्हाला विश्वास आहे की आमच्या मैत्री कायम असेल. आम्ही आमच्या शुभचिंतकांना विनंती करतो की त्यांनी या काळात आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आम्हाला पुढे जाण्यासाठी प्रायव्हसी द्यावी."
'क्या हाल मिस्टर पांचाल', 'चिंटू चिंकी और एक बडी सी लव्ह स्टोरी' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या शोमध्ये काम करून श्रुती रावत घराघरात प्रसिद्ध झाली आहे. श्रुती रावतने डिसेंबर २०१६ मध्ये तिचा दीर्घकाळ बॉयफ्रेंड निखिल आगवणेसोबत लग्न केले. जानेवारी 2019 मध्ये, अभिनेत्री आई झाली. लग्नाच्या सात वर्षांनी दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे.