'सहकुटुंब सहपरिवार'नंतर आणखी एक लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 02:17 PM2023-07-29T14:17:58+5:302023-07-29T14:18:17+5:30
Star Pravah : सहकुटुंब सहपरिवार ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता या वाहिनीवरील आणखी एक मालिका लवकरच निरोप घेणार आहे.
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील सहकुटुंब सहपरिवार (Sahkutumb Sahparivar) ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत असल्याचे जाहीर करण्यात आले. त्यानंतर आता या वाहिनीवरील आणखी एक मालिका लवकरच निरोप घेणार आहे. ही मालिका म्हणजे रंग माझा वेगळा (Rang Maza Vegla). रंग माझा वेगळा मालिका टीआरपीच्या शर्यतीत अव्वल होती. गेल्या ३ वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. दरम्यान आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. २२ जुलैला या मालिकेचं शेवटचं शूटिंग पार पडले आहे. या मालिकेच्या जागी तेजश्री प्रधानची नवीन मालिका दाखल होत आहे.
रंग माझा वेगळा मालिकेत कार्तिक आणि दीपाची अनोखी लव्हस्टोरी दाखवण्यात आली होती. या मालिकेने गेल्या तीन वर्षाहून जास्त काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. मात्र आता ही मालिका आटोपती घेण्यावर भर दिला जात आहे. कार्तिक आणि दीपा लवकरच एकत्र येतील आणि या मालिकेचा शेवट गोड होईल या प्रयत्नात मालिकेत अनेक ट्विस्ट आणण्यात आले आहेत. तसेच या मालिकेचं शेवटचं शूटिंगदेखील पार पडले आहे.
रंग माझा वेगळा मालिकेच्या जागी आता तेजश्री प्रधानची नवीन मालिका प्रेमाची गोष्ट दाखल होत आहे. या मालिकेतून तेजश्री प्रधान आणि राज हंचनाळे पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. मुक्ता ही कधीही आई होऊ शकत नाही पण तिच्या लग्नाची उत्सुकता तिच्या आईला नेहमी असते. मुक्ताचे लग्न जुळावे म्हणून तिची आई नेहमी प्रयत्न करते. तर मालिकेचा नायक हा एका मुलीचा वडील आहे. आपली मुलगी सईला आईसारखं प्रेम देणारी कोणीच नाही म्हणून तोही दुसरे लग्न करण्यास टाळाटाळ करतो. अर्थात मुक्ता आणि सागर हे एकमेकांना ओळखतात आणि ते शेजारीच राहतात त्यामुळे मुक्ताची चिमुकल्या सईसोबत छान गट्टी जमलेली असते. आता मुक्ता आणि सागरला जुळणारा महत्वाचा दुवा म्हणजे सई. सईच्या माध्यमातून या दोघांचे प्रेम कसे खुलत जाते हे तुम्हाला या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. तेजश्री प्रधान, राज हंचनाळे, शुभांगी गोखले, संजीवनी जाधव हे या मालिकेत महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत.