सई ताम्हणकरनंतर आता या मराठमोळ्या अभिनेत्रीनं विकत घेतलं मुंबईत घर, शेअर केला व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 18:35 IST2023-09-27T18:34:42+5:302023-09-27T18:35:04+5:30
मुळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच मुंबईत घर घेतले आहे. तिने तिच्या या नवीन घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान आता आणखी एका मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्रीने मुंबईत घर घेतले आहे.

सई ताम्हणकरनंतर आता या मराठमोळ्या अभिनेत्रीनं विकत घेतलं मुंबईत घर, शेअर केला व्हिडीओ
मुळची सांगलीची असणारी अभिनेत्री सई ताम्हणकर हिने नुकतेच मुंबईत घर घेतले आहे. तिने तिच्या या नवीन घराचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. दरम्यान आता आणखी एका मराठी सिनेइंडस्ट्रीतील अभिनेत्रीने मुंबईत घर घेतले आहे. आता ही अभिनेत्री कोण असेल हे जाणून घेण्यासाठी तुम्ही उत्सुक असाल ना. तर ही अभिनेत्री म्हणजे तुझ्यात जीव रंगला फेम वहिनीसाहेब म्हणजेच धनश्री काडगांवकर. तिने सोशल मीडियावर कीसोबतचे फोटो शेअर करत चाहत्यांना ही खुशखबर दिली आहे.
धनश्री काडगांवकर हिने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत लिहिले की, नवीन घर...स्वप्न खरी होतात. तिने मुंबईत कुठे घर घेतले हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र तिच्या या पोस्टवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.
कामासाठी धनश्रीला पुण्यातून मुंबईत शिफ्ट व्हावे लागले होते. लगेच पुण्यातून मुंबईत शिफ्ट होणे तिच्यासाठी सोपे नव्हते. कारण तिला दोन वर्षांचा मुलगा आहे. त्याचा दवाखाना, त्याला द्यावी लागणाऱ्या लसी...यामुळे सुरुवातीला ती एकटीच मुंबईत आली होती. आता मुंबईत घर घेतल्यानंतर तिचा हे मुंबई-पुणे -मुंबई हा प्रवास थांबणार आहे.
धनश्री काडगांवकर सध्या झी मराठी वाहिनीवरील तू चाल पुढं या मालिकेत पाहायला मिळत आहे. यात तिने शिल्पीची भूमिका साकारली आहे. तिने साकारलेल्या या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळताना दिसत आहे. धनश्री २०१० साली 'महाराष्ट्राचा सुपरस्टार'मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. यानंतर तिने कलर्स मराठीवर 'फुलाला सुगंध मातीचा' ही पहिलीवहिली मालिका केली. या मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर ती तुझ्यात जीव रंगला मालिकेत वहिनीसाहेबची भूमिका साकारली होती. ही ग्रे शेड भूमिका होती, ज्याला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली.