'पांडू' चित्रपटानंतर भाऊ कदम झळकणार या सिनेमात, दिसणार डबल रोलमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 01:45 PM2022-08-16T13:45:18+5:302022-08-16T13:45:49+5:30

Bhau Kadam: भाऊ कदम हटके अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

After the movie 'Pandu', Bhau Kadam will appear in this movie, in a double role | 'पांडू' चित्रपटानंतर भाऊ कदम झळकणार या सिनेमात, दिसणार डबल रोलमध्ये

'पांडू' चित्रपटानंतर भाऊ कदम झळकणार या सिनेमात, दिसणार डबल रोलमध्ये

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील चला हवा येऊ द्या (Chala Hawa Yeu Dya) या कॉमेडी शो मधून घराघरात पोहचलेला विनोदवीर भाऊ कदम (Bhau Kadam)ने आपल्या टॅलेंटच्या जोरावर रसिकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. भाऊ कदम शेवटचा पांडू चित्रपटात पाहायला मिळाला होता. या चित्रपटात त्याने साकारलेला हवालदार रसिकांच्या पसंतीस उतरली आहे. त्यानंतर आता भाऊ कदम आणखी एका चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तो दुहेरी भूमिकेत दिसणार आहे.
भाऊ कदमने इंस्टाग्रामवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत लिहिले की, धम्माल एंटरटेनमेंटचा डब्बल बार, सर्व टेंशन्सवर करणार डब्बल वार ! तुम्हाला खळखळून हसवायला घेऊन येत आहोत भाऊ कदमच्या कॉमेडीचा डब्बल धमाका, 'घे डब्बल' ३० सप्टेंबर पासून सर्व चित्रपटगृहांत.
जिओ स्टुडिओज व फाईन क्राफ्ट निर्मित ‘घे डबल’ या चित्रपटाचे भन्नाट टिझर पोस्टर सोशल मीडियावर झळकले आहे. येत्या ३० सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात झळकणाऱ्या या चित्रपटात भाऊ कदम आणि भूषण पाटील यांची जबरदस्त जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यास तयार आहे.या चित्रपटाचे दिग्दर्शन विश्वास जोशी यांनी केले असून ज्योती देशपांडे आणि जिओ स्टुडिओज् चित्रपटाचे निर्माते आहेत.


या चित्रपटाचे दिग्दर्शक विश्वास जोशी म्हणतात, जिओ स्टुडिओज वेगवेगळ्या विषयांवर चित्रपट करण्याचा प्रयत्न करत आहे आणि त्यातच 'घे डबल' हा विनोदी चित्रपट ते सादर करत आहेत. हा एक निखळ मनोरंजन करणारा कौटुंबिक चित्रपट असून यात भाऊ कदम आणि भूषण पाटील हे दोघं विनोदवीर धुमाकूळ घालणार आहेत. आणि मला खात्री आहे की हा चित्रपट प्रेक्षकांचे डबल मनोरंजन नक्की करणार.

Web Title: After the movie 'Pandu', Bhau Kadam will appear in this movie, in a double role

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.