'लोकमान्य' आणि '३६ गुणी जोडी' मालिकेनंतर आता झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 02:29 PM2023-07-19T14:29:05+5:302023-07-19T14:29:36+5:30

झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिका कमी टीआरमुळे बंद होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. त्यानंतर आता झी मराठी वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.

After the series 'Lokmanya' and '36 Guni Jodi', will you bid farewell to this series on Zee Marathi? | 'लोकमान्य' आणि '३६ गुणी जोडी' मालिकेनंतर आता झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप?

'लोकमान्य' आणि '३६ गुणी जोडी' मालिकेनंतर आता झी मराठीवरील ही मालिका घेणार निरोप?

googlenewsNext

झी मराठी वाहिनीवरील ‘लोकमान्य’ आणि ‘३६ गुणी जोडी’ या मालिका कमी टीआरमुळे बंद होणार असल्याचे काही दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. त्यानंतर आता झी मराठी वाहिनीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. लागिर झालं जी या मालिकेतून लोकप्रिय झालेली शीतली म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर हिची लवंगी मिरची लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. ही मालिका बंद होण्यामागचे कारणदेखील टीआरपी असल्याचे सांगितले जात आहे.

शिवानी बावकरची लवंगी मिरची मालिका १३ फेब्रुवारी २०२३ पासून सुरू झाली होती. सुरुवातीपासूनच या मालिकेला प्रेक्षकांची जास्त पसंती मिळाली नाही. तसेच या मालिकेचा टीआरपीही कमी होता. त्यामुळे ही मालिका बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नुकतेच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंग पार पडले आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ही मालिका प्रसारीत होणार आहे. या मालिकेच्या जागी सारेगमप लिटल चॅम्प्स पाहायला मिळणार आहे.

सारं काही तिच्यासाठी मालिका लवकरच भेटीला
झी मराठी वाहिनीवर अशीच एक नवीन मालिका दाखल होणार आहे. दोन सख्ख्या बहिणींची झालेली ताटातूट सारं काही तिच्यासाठी या मालिकेतून दाखवली जाणार आहे. अभिनेत्री खुशबू तावडे आणि शर्मिष्ठा राऊत यांनी या मालिकेत बहिणींची भूमिका साकारली आहे तर बऱ्याच प्रतीक्षेनंतर अशोक शिंदे सुद्धा मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत.

Web Title: After the series 'Lokmanya' and '36 Guni Jodi', will you bid farewell to this series on Zee Marathi?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.