Zee marathi awards 2019 Winners : या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्डसमध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 03:27 PM2019-10-12T15:27:10+5:302019-10-12T15:31:50+5:30

प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना भरभरून मतं दिल्यामुळे कुठले कलाकार विजयी ठरले हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Agabai Sasubai and ratris khel chale 2 receives maximum awards in zee marathi awards 2019 | Zee marathi awards 2019 Winners : या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्डसमध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका

Zee marathi awards 2019 Winners : या मालिकेने मारली झी मराठी अवॉर्डसमध्ये बाजी, नुकतीच सुरू झालीय ही मालिका

googlenewsNext
ठळक मुद्देअग्गंबाई सासूबाई या मालिकेला या पुरस्कार सोहळ्यात सगळ्यात जास्त पुरस्कार मिळाले.

झी मराठीच्या मालिका प्रेक्षकांमध्ये कमालीच्या लोकप्रिय आहेत. सायंकाळची साडेसहाची वेळ झाली की ‘होम मिनिस्टर’ कार्यक्रमापासून झी मराठी ही वाहिनी घराघरात सुरु होते आणि रात्रीस खेळ चाले २ मालिकेपर्यंत प्रेक्षक मनोभावे हे कार्यक्रम बघतात. 

‘मिसेस मुख्यमंत्री’, 'अगंबाई सासूबाई' असो की ‘तुझ्यात जीव रंगला’ यातील सर्व व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. ‘माझ्या नवऱ्याची बायको’ मधील राधिकाच्या समस्या प्रेक्षकांना आपल्याशा वाटतात. ‘चला हवा येऊ द्या’ ची मंडळी प्रेक्षकांना खळखळून हसवतात तर ‘भागो मोहन प्यारे’ आणि अल्टी पल्टी मालिकेतील कलाकार प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतात. ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेच्या भव्यतेने प्रेक्षकांचे डोळे दिपून गेले आहेत.

झी मराठीवरील याच मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड्स. दरवर्षी अतिशय देखण्या आणि दिमाखदार पद्धतीने हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडतो. कलाकारांचे दिलखेचक परफॉरमन्स, विनोदी स्किटस् आणि सोबतीला कोणता कलाकार, कोणती जोडी, कोणती मालिका, कोणतं कुटुंब सर्वोत्कृष्ट ठरेल याची लागलेली उत्सुकता अशा वातावरणात हा कार्यक्रम रंगतो. यंदा झी मराठी वाहिनीने २० वर्षांचा यशस्वी प्रवास पूर्ण केला त्यामुळे या सोहळ्याची रंगत अजूनच वाढली आहे. हा दैदिप्यमान सोहळा प्रेक्षकांना रविवार २० ऑक्टोबर संध्याकाळी ७ वाजता पाहायला मिळणार आहे. त्याचसोबत प्रेक्षकांनी त्यांच्या आवडत्या कलाकारांना भरभरून मतं दिल्यामुळे कुठले कलाकार विजयी ठरणार याची उत्सुकता सगळ्यांनाच आहे, त्यांची हीच उत्सुकता जास्त ताणून न धरता विजेत्यांची नावे आम्ही जाहीर करत आहोत. झी मराठी अवॉर्ड्स २०१९ च्या पुरस्कारांवर विजयाची मोहोर उमटवलेल्या कलाकारांची नावे खालीलप्रमाणे...

सर्वोत्कृष्ट मालिका - अग्गंबाई सासूबाई 
सर्वोत्कृष्ट कथाबाह्य कार्यक्रम - रामराम महाराष्ट्र  
सर्वोत्कृष्ट नायिका - सुमी (मिसेस मुख्यमंत्री)
सर्वोत्कृष्ट नायक - मोहन (भागो मोहन प्यारे)
सर्वोत्कृष्ट जोडी - अभिजित-आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (पुरुष) - अण्णा (रात्रीस खेळ चाले २)
सर्वोत्कृष्ट व्यक्तिरेखा (महिला) - शेवंता (रात्रीस खेळ चाले २)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (पुरुष) - चोंट्या (रात्रीस खेळ चाले २)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक व्यक्तिरेखा (महिला) - छाया (रात्रीस खेळ चाले २)
सर्वोत्कृष्ट भावंडं - सुमी-बबन  (मिसेस मुख्यमंत्री)
सर्वोत्कृष्ट सून - आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सासू - आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट सासरे - आजोबा (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (स्त्री) - मॅडी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट विनोदी व्यक्तिरेखा (पुरुष) - मोहन (भागो मोहन प्यारे)
सर्वोत्कृष्ट आई - आसावरी (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट वडील - गुरुनाथचे बाबा (माझ्या नवऱ्याची बायको)
सर्वोत्कृष्ट कुटुंब - कुलकर्णी कुटुंब (अग्गंबाई सासूबाई)
सर्वोत्कृष्ट खलनायिका - वच्छी (रात्रीस खेळ चाले २)
सर्वोत्कृष्ट खलनायक - अण्णा (रात्रीस खेळ चाले २)
सर्वोत्कृष्ट बालकलाकार - लाडू (तुझ्यात जीव रंगला)
सर्वोत्कृष्ट शीर्षकगीत - अग्गंबाई सासूबाई

Web Title: Agabai Sasubai and ratris khel chale 2 receives maximum awards in zee marathi awards 2019

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.