Farewell it is ! खूप आठवण येईल सगळ्यांची...; ‘बबड्या’ भावूक झाला, प्रेक्षकांचा निरोप घेताना गहिवरला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2021 01:20 PM2021-03-08T13:20:16+5:302021-03-08T13:23:14+5:30
सोशल मीडियावर पोस्ट लिहून बबड्या उर्फ सोहमने म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्कीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका आणि त्यावरचे भन्नाट मीम्स म्हणजे मनोरंजनाचा आणखी एक पर्याय झाला होता. या मालिकेइतके मीम्स क्वचितच अन्य कुठल्या मालिकेवर बनले असतील. बबड्यावरचे हसून लोटपोट करणारे मीम्स तर शेकडोंच्या संख्येने सापडतील. बबड्या उर्फ सोहमने म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्कीने ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका प्रचंड गाजवली. या बबड्याची कधी नव्हे इतकी चर्चा झाली. आईच्या अति लाडाने लाडावलेला बबड्याचीच घरोघरी चर्चा होती. पण आता ‘अग्गंबाई सासूबाई’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतेय आणि याच मालिकेचा दुसरा सीझन ‘अग्गंबाई सूनबाई’ रसिक प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या निरोपाच्या क्षणी बबड्या भावूक झालेला पाहायला मिळतोय.
सोशल मीडियावर पोस्ट लिहून बबड्या उर्फ आशुतोष पत्कीने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
आशुतोष लिहितो,
Farewell it is !!
"सोहम" ऊर्फ "बबड्या"... काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर हे पात्र कायम १नंबर वर असेल माझ्यासाठी, कारण "अग्गंबाई सासूबाई" was a big learning lesson... मराठी भाषेपासून, कलाकाराने camera समोर भावना कशा व्यक्त कराव्यात आणि लोकांच्या मनाचा कसा ठाव घ्यावा हे या मालिकेने शिकवलं... सगळ्या दिग्गज कलाकारांच्या सहवासात खूप शिकलो, सगळ्यांनी मला मनापासून सांभाळून घेतलं या साठी I am very grateful. तुम्ही मायबाप प्रेक्षक तुम्ही सुद्धा खूप प्रेम दिलत.
हे पाहिलं पर्व संपताना सगळा प्रवास आठवतोय... खूप आठवण येईल सगळ्यांची पण "पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त"... लवकरच एक नवीन चेहरा घेऊन पुन्हा तुमच्या भेटीला येईन आणि पुन्हा नव्याने प्रयत्न करीन तुमच्या मनात घर करण्याचा.. wishing a great success to team "अग्गंबाई सूनबाई" I am sure u all will rock...
‘अग्गंबाई सासूबाई’ मालिकेत अभिनेता आशुतोष पत्कीने सोहम अर्थात बबड्याची भूमिका साकारली. लाडाने वाया गेलेला आणि आईची अजिबात काळजी नसलेला मुलगा अशा नकारात्मक छटा असलेल्या या भूमिकेने आशुतोषला अपार लोकप्रियता दिली. तेवढाच तिरस्कारही त्याच्या वाटयाला आला.अलीकडे एका मुलाखतीत खुद्द आशुतोषने याबद्दल सांगितले होते. ‘मालिकेतील बबड्या या व्यक्तिरेखेमुळे मला खूप लोक ओळखू लागलेत. पण मी ख-या आयुष्यातदेखील बबड्यासारखा बिघडलेला, आईची काळजी न घेणारा आहे, असा लोकांचा समज होतो. या मालिकेमुळे मला असे खूप विचित्र अनुभव आलेत. अगदी माझ्या शेजारी राहणा-या लोकांचे माझ्यासोबतचे वागणे बदलले. माझ्याशी पूर्वी बोलणारे लोक माज्याकडे दुर्लक्ष करू लागलेत. अनेकदा मी माझ्या आईचाही राग ओढवून घेतो. अर्थात सोहम ही माज्या वाट्याला आलेली भूमिका आहे आणि ती प्रामाणिकपणे साकारण्याचा प्रयत्न करतो. माझ्यावर मीम्स मी कधीही मनावर घेतले नाही. उलट हे माझ्या भूमिकेचे, माझ्या अभिनयक्षमतेचे फलित आहे असे मी मानतो,’असे त्याने या मुलाखतीत सांगितले होते.