अग्गंबाई सासूबाई फेम आशुतोष पत्कीला पाहून लोक करतात दुर्लक्ष, कारण वाचून आवरणार नाही हसू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2020 19:31 IST2020-01-15T19:29:49+5:302020-01-15T19:31:56+5:30

अग्गंबाई सासूबाई या मालिकेतील सोहम म्हणजेच आशुतोषने ही गोष्ट नुकतीच सांगितली आहे.

aggabai sasubai soham aka ashutosh patki shares her experience | अग्गंबाई सासूबाई फेम आशुतोष पत्कीला पाहून लोक करतात दुर्लक्ष, कारण वाचून आवरणार नाही हसू

अग्गंबाई सासूबाई फेम आशुतोष पत्कीला पाहून लोक करतात दुर्लक्ष, कारण वाचून आवरणार नाही हसू

ठळक मुद्देएवढेच नव्हे तर ही मालिका सुरू झाल्यापासून माझ्या शेजारी राहाणाऱ्या लोकांचे माझ्याबाबतचे वागणे बदलले आहे. माझ्याशी पूर्वी बोलणारे लोकदेखील आता माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत.

अग्गंबाई सासूबाई ही मालिका प्रेक्षकांना प्रचंड आवडते. या मालिकेतील सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतल्या आहेत. मालिकेच्या कथेतील नाविन्य, मालिकेची आगळी-वेगळी कथा, मालिकेचं वेगळं टेकिंग, निवेदिता सराफ-गिरीश ओक ही जोडी या सगळ्यामुळे मालिकेने अल्पशा कालावधीतच प्रेक्षकांच्या मनावर राज्य करायला सुरुवात केली आहे. या मालिकेमुळे अनेक तरुणींच्या गळ्यातला ताईत बनलेला प्रेक्षकांचा लाडका सोहम म्हणजेच अभिनेता आशुतोष पत्की याने त्याच्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.

अग्गंबाई सासूबाई या मालिकेत काम केल्यानंतर सोहमच्या म्हणजेच आशुतोषच्या आयुष्यात कोणकोणते बदल घडले हे त्याने नुकत्याच टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. त्याने या मुलाखतीत सांगितले आहे की, या मालिकेमुळे मला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पण या मालिकेत मी साकारत असलेल्या सोहम या व्यक्तिरेखेला काहीशा नकारात्मक छटा आहेत. तो प्रचंड बिघडलेला असून त्याला त्याच्या आईची अजिबातच काळजी नाहीये असे मालिकेत दाखवण्यात आलेले आहे. या व्यक्तिरेखेमुळे मी खऱ्या आयुष्यात देखील असाच आहे असा अनेकवेळा लोकांचा समज होतो. या मालिकेमुळे मला असाच एक विचित्र अनुभव नुकताच आला आहे.

या अनुभवाविषयी आशुतोष सांगतो, मी, माझा मित्र आणि त्याचे बाबा असे आम्ही एका ठिकाणी जेवायला बाहेर गेलो होतो. माझ्या मित्राचे बाबा ही मालिका न चुकता पाहातात. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण माझ्या मित्राला त्याच्या वडिलांनी विचारले की, हा आशुतोष देखील खऱ्या आयुष्यात सोहमसारखाच आहे का? हे ऐकून मी काय प्रतिक्रिया देऊ हेच मला कळत नव्हते. एवढेच नव्हे तर ही मालिका सुरू झाल्यापासून माझ्या शेजारी राहाणाऱ्या लोकांचे माझ्याबाबतचे वागणे बदलले आहे. माझ्याशी पूर्वी बोलणारे लोकदेखील आता माझ्याकडे दुर्लक्ष करू लागले आहेत. 

Web Title: aggabai sasubai soham aka ashutosh patki shares her experience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.