हिना खानच्या बॉयफ्रेंडचं महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान, व्हिडीओद्वारे दाखवली झलक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 11:50 IST2025-02-09T11:50:20+5:302025-02-09T11:50:37+5:30
हिनाचा बॉयफ्रेंड प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात सहभागी झाला.

हिना खानच्या बॉयफ्रेंडचं महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान, व्हिडीओद्वारे दाखवली झलक
अभिनेत्री हिना खान (Hina Khan) ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे याची सगळ्यांनाच कल्पना आहे. ती लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहे. हिना सुद्धा कॅन्सरशी सामना करत असतानाही सोशल मीडियावर सतत अपडेट देत असते. या कठीण काळात हिना खानचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल तिच्यामागे खंबीरपणे उभा आहे. तो सावलीसारखा तिच्यासोबत चालत आहे. अशातच हिनाच्या बॉयफ्रेंडनं प्रयागराज येथील महाकुंभमेळ्याला (mahakumbhmela) हजेरी लावली. इतकंच नव्हे, महाकुंभमेळ्यात पवित्र स्नान केलं.
हिनाचा बॉयफ्रेंड रॉकी जैस्वाल हा नुकतंच प्रयागराजला पोहचला. त्यानं महाकुंभमेळ्यातील व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, "हर हर महादेव! मी खूप भाग्यवान आहे की माझ्या कुटुंबात महाकुंभमध्ये भाग घेणारा मी पहिला व्यक्ती आहे. संगमात वाहणारं नदीचं पाणी भारावून टाकणारं होतं. महाकुंभ ऋग्वेदाइतकाच जुना असल्याचं मानलं जातं आणि अनेक पुराणांमध्ये याचा उल्लेख आहे. महाकुंभला जोपर्यंत मानलं जातं त्याबाबत अनेक पुराणात नमूद केलं आहे. हजारो वर्षांपासून होणारी एक पवित्र घटना मानली जाते. प्रयागराज हे मानवी सभ्यतेचे एक केंद्र आणि बुद्धिमत्तेचा जन्म मानलं जातं, ज्याचे वर्णन सॅमुद्र मथनच्या कथेत केलं गेलं आहे".
"सूर्य, चंद्र, शुक्र, मंगळ, बृहस्पति, शनि, युरेनस आणि नेपच्यून (मुख्यतः) सरळ रेषेत आहेत. हे खूप विशेष आहे, कारण ज्युपिटरच्या सूर्याभोवती १२ फेऱ्या म्हणजे पृथ्वीवरील १४४ वर्षे. गंगा, यमुना आणि (लपविलेले) सरस्वती खनिजे आणि कंपनांनी समृद्ध होते, जे या काळात घडतं, असं मानलं जातं, जे आकलनपलीकडे आहे. मी संस्कृती, श्रद्धा आणि समर्पणासाठी गेलो होतो. प्रत्येकाने एकदा याचा अनुभव घेतला पाहिजे". रॉकी जैस्वालचा हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. रॉकी जैस्वाल हा हिंदू आहे. तर हिना खान ही मुस्लिम आहे. मात्र, धर्माची भींत पाडून दोघेही एकमेंकाची साथ निभावत आहेत.
प्रयागराजमध्ये १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्याची सुरूवात झाली आहे. या ऐतिहासिक सोहळ्यासाठी देशभरातून आणि परदेशातून लाखो भाविक प्रयागराजला गंगा, यमुना आणि अदृश्य सरस्वती नदीच्या संगमावर येत आहेत. त्रिवेणी संगम, हा गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगम आहे. त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी फक्त गंगा आणि यमुना नद्याच दिसतात. संगमाच्या ठिकाणी यमुना नदी पश्चिमेकडून वाहत येते तर गंगा नदी उत्तर दिशेकडून वाहत येते. त्रिवेणी संगमावर या दोन्ही नद्या एकत्र होतात. तिथून पुढे ती गंगा नदी म्हणूनच ओळखली जाते. सरस्वती नदी त्रिवेणी संगमात एक आंतरप्रवाह म्हणून वाहते. सरस्वती नदी लुप्त किंवा गायब होण्यामागे अनेक कथा आहेत.