एहसान कुरेशीने दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट, म्हणाले- 'डॉक्टरांनी उत्तर दिलं, फक्त....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 19, 2022 03:41 PM2022-08-19T15:41:03+5:302022-08-19T15:45:45+5:30

Raju Srivastava: कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी राजू यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. राजू यांच्या मेंदूने काम करणे थांबवले आहे.

Ahsaan qureshi on Raju Srivastava health update says doctors have given up only a miracle can save him | एहसान कुरेशीने दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट, म्हणाले- 'डॉक्टरांनी उत्तर दिलं, फक्त....

एहसान कुरेशीने दिली राजू श्रीवास्तव यांची हेल्थ अपडेट, म्हणाले- 'डॉक्टरांनी उत्तर दिलं, फक्त....

googlenewsNext

Raju Srivastava Health Update : आपल्या कॉमेडीने सगळ्यांना खळखळून हसवणारे कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. गेल्या 10 ऑगस्टला राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. जिममध्ये वर्कआऊट करत असतानाच ते कोसळले. तेव्हापासून दिल्लीच्या एम्स रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र कालपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जात आहे. राजू यांचा ब्रेन जवळपास ‘डेड’ झाल्याचं म्हटलं जात आहे. अशातच कॉमेडियन एहसान कुरेशी यांनी राजू यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. राजू यांच्या मेंदूने काम करणे थांबवले असून आता आम्ही काहीतरी चमत्कार घडावा यासाठी प्रार्थना करत आहोत, असे एहसान कुरेशी म्हणाले. 

पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीत एहसान कुरेशी म्हणाले - डॉक्टरांनी उत्तर दिले आहे. त्याने जे काही प्रयत्न करायचे होते ते सगळे त्यांनी केले आहेत. आता केवळ चमत्कारच त्याला वाचवू शकतो, असे डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबीयांना सांगितले आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी खोटी आहे. त्याच्या मेंदूने काम करणे बंद केल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. आम्ही सर्व मित्र आहोत आणि त्यांच्यासाठी हनुमान चालीसा वाचत आहोत. एहसान कुरेशीने सर्वांना चमत्कार घडावा यासाठी प्रार्थना करण्यास सांगितले. बॉलीवूड अभिनेता राजपाल यादवनेही सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करून त्याच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केली आहे.

राजू श्रीवास्तव यांची मुलगी अंतरा हिनेही वडिलांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली. पीटीआयशी बातचीत करताना ती म्हणाली, ‘ पापांवर सध्या उपचार सुरू आहेत. सर्व डॉक्टर्स त्यांच्यावर उपचार करत आहेत. यापेक्षा जास्त मी सध्या काहीही बोलू शकत नाही.’

Web Title: Ahsaan qureshi on Raju Srivastava health update says doctors have given up only a miracle can save him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.