'ऐका दाजीबा' फेम ईशिता अरुणसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये रंगणार हास्यमैफील

By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2024 08:02 PM2024-05-28T20:02:38+5:302024-05-28T20:03:35+5:30

Ishita Arun : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण हजेरी लावणार आहे. ईशितासोबत या कार्यक्रमात हास्यमैफील रंगणार आहे.

'Aika Dajeeba' fame Ishita Arun to stage a comedy concert at 'Maharashtra Laughter Fair' | 'ऐका दाजीबा' फेम ईशिता अरुणसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये रंगणार हास्यमैफील

'ऐका दाजीबा' फेम ईशिता अरुणसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये रंगणार हास्यमैफील

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजे 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'. घराघरांत हास्याची कारंजी फुलवणारी ही जत्रा 'सहकुटुंब हसू या' म्हणत, प्रत्येक कुटुंबाला बांधून ठेवण्याचे काम करते आहे. आता कार्यक्रमात ऐका दाजीबा फेम ईशिता अरुण हजेरी लावणार आहे. ईशितासोबत या कार्यक्रमात हास्यमैफील रंगणार आहे.

ईशिता अरुण समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप या दोघांबरोबर प्रहसन सादर करणार आहे. आजवर तिच्या नृत्यामुळे ईशिताचा सगळीकडे नावलौकिक असल्यामुळे ती फार चर्चेत असते. पण आपली ही आवडती अभिनेत्री आता 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमात प्रहसन करताना पाहायला मिळेल.
ऐका दाजीबा गाण्यामुळे ईशिता अरुण ही दाजीबा गर्ल म्हणून सर्वत्र लोकप्रिय झाली आहे. २२ वर्षांपूर्वी हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते आणि अजूनही हे गाणे आणि त्याचे संगीत सर्वांना ठेका धरायला भाग पाडते. पण या वीकेंडला ईशिता अरुणसोबत धमाल हास्यमैफील रंगणार आहे.

समीर चौघुले आणि पृथ्वीक प्रताप यांच्याबरोबर ईशिता सादरीकरण करणार आहे. या निमित्ताने ईशिताचा मराठीतला कॉमेडी अंदाज प्रेक्षकांना पाहायला मिळेल. मराठीतल्या ठसकेदार कॉमेडीचा ईशिताचा अंदाज काही वेगळाच आहे. तेव्हा ही धमाल मस्ती आणि विशेष असा हा भाग पाहायला विसरू नका. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा - सहकुटुंब हसू या', येत्या शनिवारी आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त सोनी मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

Web Title: 'Aika Dajeeba' fame Ishita Arun to stage a comedy concert at 'Maharashtra Laughter Fair'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.