ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2024 12:52 PM2024-07-11T12:52:04+5:302024-07-11T12:53:14+5:30

ऐश्वर्या-अविनाश नारकर ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवत असतात. नुकतंच त्यांनी 'नाच गो बया' या गाण्यावर रील बनवला आहे.

aishwarya narkar and avinash narkar dance on nach go baya trending song watch video | ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

ऐश्वर्या-अविनाश नारकर म्हणतात "नाच गो बया", ट्रेंडिंग गाण्यावरचा भन्नाट डान्स एकदा पाहाच

ऐश्वर्या नारकर आणि अविनाश नारकर हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय कपल आहेत. त्यांच्याकडे आदर्श कपल म्हणून पाहिलं जातं. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं अविरतपणे मनोरंजन करत आहेत. केवळ अभिनयानेच नव्हे तर रील व्हिडिओनेही ते चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असतात. पन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या ऐश्वर्या-अविनाश या एव्हरग्रीन कपलची एनर्जी भल्याभल्यांना लाजवेल अशीच आहे. 

ऐश्वर्या-अविनाश नारकर सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. ट्रेंडिंग गाण्यावर ते रील व्हिडिओ बनवत असतात. नुकतंच त्यांनी 'नाच गो बया' या गाण्यावर रील बनवला आहे. याचा व्हिडिओ ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या नारकर या साडीत ठुमके लगावताना दिसत आहेत. तर अविनाश यांनीही त्यांना उत्तम साथ दिली आहे. 'नाच गो बया' या गाण्याच्या हुक स्टेप्सही त्यांनी केल्या आहेत. इतर व्हिडिओप्रमाणे त्यांचा हा व्हिडिओही चर्चेत आहे. 

दरम्यान, 'नाच गो बया' हे गाणं अलिकडेच प्रदर्शित करण्यात आलं आहे. या गाण्यात पूजा सावंत, अक्षया नाईक, आयुष संजीव, निखिल शिंदे, रितेश कांबळे हे कलाकार आहेत. प्रदर्शित होताच हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड झालं आहे. 

Web Title: aishwarya narkar and avinash narkar dance on nach go baya trending song watch video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.