'सूसेकी'च्या फ्युजन गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल, व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2024 01:01 PM2024-06-18T13:01:13+5:302024-06-18T13:02:10+5:30

Avinash Narkar-Aishwarya Narkar : मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी सूसेकी गाण्याच्या फ्युजनवर रिल बनवला आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

Aishwarya Narkar-Avinash Narkar danced to the fusion song of 'Angaro Sa', the video went viral | 'सूसेकी'च्या फ्युजन गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल, व्हिडीओ व्हायरल

'सूसेकी'च्या फ्युजन गाण्यावर थिरकले ऐश्वर्या-अविनाश नारकरांनी धरला ताल, व्हिडीओ व्हायरल

'पुष्पा २' (Pushpa 2) रिलीज व्हायला अजून बराच अवधी आहे, त्याआधीच या सिनेमाची क्रेझ लोकांमध्ये पाहायला मिळत आहे. सध्या या चित्रपटातील दोन गाणी इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत. या चित्रपटातील 'सूसेकी...' हे गाणे सोशल मीडियावर इतके ट्रेंड करत आहे की लोक या गाण्यावर खूप रिल्स करत आहेत. दरम्यान आता या गाण्यावर मराठी कलाविश्वातील एव्हरग्रीन कपल म्हणजे अविनाश नारकर (Avinash Narkar) आणि ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) यांनी रिल बनवला आहे. त्यांच्या या रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.

अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर हे कपल सोशल मीडियावर सक्रीय असतात. बऱ्याचदा ते ट्रेडिंग रिलवर थिरकताना दिसतात. बऱ्याचदा त्यांचे रिल सोशल मीडियावर व्हायरल होताना मिळतात. दरम्यान आता त्यांनी ट्रेडिंग गाणं सूसेकीचे रिमिक्सवर रिल बनवला आहे.  सुरुवातीला 'अंगारो सा' गाण्यावर दोघे अगदी कॅज्युअल लूकमध्ये डान्स करताना दिसत आहे. त्यानंतर ते 'एक लाजरान साजरा मुखडा' या गाण्यावर थिरकले आहेत.

नेटकऱ्यांची रिलला मिळतेय पसंती
अविनाश आणि ऐश्वर्या नारकर यांच्या सूसेकी फ्युजन गाण्यावरील रिलला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे. चाहते या रिलवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. यावर अभिजीत खांडकेकरने या रिलवर कमाल अशी कमेंट केलीय. एका युजरने लिहिले की, जोडी नंबर वन. दुसऱ्या युजरने म्हटले की, तुम्ही दोघे बेस्ट आहात. तर बऱ्याच जणांनी सुंदर, भारी, मस्त अशा कमेंट केल्या आहेत.    

या दिवशी येणार पुष्पा भेटीला
'पुष्पा २'च्या निर्मात्यांनी नवीन पोस्टर शेअर करत सिनेमाच्या रिलीज डेटची अधिकृत घोषणा केलीय. 'पुष्पा २' सिनेमाच्या नवीन पोस्टरमध्ये अल्लूने कोट परिधान केला असून डोक्याला शेला गुंडाळला आहे. हातात तलवार असलेल्या खतरनाक अंदाजात अल्लू अर्जुन दिसतोय. या पोस्टरवर 'पुष्पा २' ची रिलीज डेटही पाहायला मिळत आहे. ६ डिसेंबर २०२४ ला 'पुष्पा २' रिलीज होणार आहे.

Web Title: Aishwarya Narkar-Avinash Narkar danced to the fusion song of 'Angaro Sa', the video went viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.