‘बादल बरसा’ गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा डान्स, व्हिडिओ पाहून अविनाश नारकर म्हणाले "आग..."

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 11:54 AM2023-07-26T11:54:04+5:302023-07-26T12:03:52+5:30

Video : ऐश्वर्या नारकर यांना आवरला नाही ‘बादल बरसा’वर डान्स करण्याचा मोह, अविनाश नारकर कमेंट करत म्हणाले...

aishwarya narkar dance on badal barsa bijuli song video goes viral husband avinash narkar commented | ‘बादल बरसा’ गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा डान्स, व्हिडिओ पाहून अविनाश नारकर म्हणाले "आग..."

‘बादल बरसा’ गाण्यावर ऐश्वर्या नारकर यांचा डान्स, व्हिडिओ पाहून अविनाश नारकर म्हणाले "आग..."

googlenewsNext

अनेक मराठी चित्रपटांत काम करुन गेली कित्येक वर्ष अभिनेत्री ऐश्वर्या नारकर प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. अभिनयाबरोबरच त्यांच्या सौंदर्याचेही चाहते आहेत. ऐन पन्नाशीतही ऐश्वर्या त्यांच्या फिटनेसकडे विशेष लक्ष देताना दिसतात. ऐश्वर्या सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. सध्या त्यांच्या एका व्हिडिओने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सध्या रीलवर ‘बादल बरसा बिजुली’ हे गाणं ट्रेडिंग आहे. या गाण्यावरील अनेक रील व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांनाही या गाण्यावर रील करण्याचा मोह आवरता आलेला नाही. ऐश्वर्या यांनी अभिनेता अमोल बावडेकरसह ‘बादल बरसा बिजुली’ या गाण्यावर रील बनवला आहे. या व्हिडिओत ते दोघेही गाण्याच्या हुक स्टेप करताना दिसत आहेत. ऐश्वर्या यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. “बादल...बादल...बादल...फायनली आपण हे केलं. कमाल आहे हे” असं कॅप्शन त्यांनी या व्हिडिओला दिलं आहे.

“मी बहिरी नाहीये”, पापाराझींवर भडकणाऱ्या जया बच्चन ट्रोल, नेटकरी म्हणाले, “म्हणून अमिताभ बच्चन...”

ऐश्वर्या यांच्या हा व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क झाले आहेत. त्यांच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत. अभिनेत्री तितिक्षा तावडेने कमेंट करत “उफ किती छान” असं म्हटलं आहे. ऐश्वर्या नारकर यांचे पती आणि अभिनेते अविनाश नारकर यांनी “आग लगा दी” अशी कमेंट केली आहे. ऐश्वर्या नारकर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

'जत्रा'मुळे केदार शिंदेंच्या डोक्यावर झालेलं ९० लाखांचं कर्ज, म्हणाले, "घर, बायकोचे दागिने गहाण ठेवून..."

याआधी ऐश्वर्या आणि अविनाश नारकर यांच्या तमन्ना भाटियाच्या गाण्यावरील व्हिडिओची प्रचंड चर्चा रंगली होती. त्यांच्या या रीलने प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. सध्या ऐश्वर्या या झी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

Web Title: aishwarya narkar dance on badal barsa bijuli song video goes viral husband avinash narkar commented

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.