रोज डब्याला काय आणता? व्हिडीओ दाखवत ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला फिटनेस फंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2024 15:23 IST2024-02-09T15:13:45+5:302024-02-09T15:23:29+5:30
ऐश्वर्या नारकरांनी एक व्हिडीओ दाखवत त्यांचा फिटनेस फंडा सर्वांसमोर उघड केलाय (Aishwarya Narkar Fitness Funda)

रोज डब्याला काय आणता? व्हिडीओ दाखवत ऐश्वर्या नारकरांनी शेअर केला फिटनेस फंडा
ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) या मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. ऐश्वर्या यांना आजवर आपण विविध मालिका, सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. इतकंच नव्हे तर जाहिरात विश्वात सुद्धा ऐश्वर्या नारकर यांचा चांगलाच बोलबाला आहे. ऐश्वर्या या पन्नाशीच्या घरात असल्या तरीही त्या फिट अँड फाईन आहेत. ऐश्वर्या यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत त्यांच्या फिटनेसचा व्हिडीओ शेअर केलाय.
ऐश्वर्या या सध्या सातव्या मुलीची सातवी मुलगी (Satvya Mulichi Satvi Mulgi) मालिकेत अभिनय करत आहेत. ऐश्वर्या यांनी मालिकेच्या सेटवरील एक व्हिडीओ शेअर केलाय. या व्हिडीओत ऐश्वर्या शुटींगच्या वेळातून ब्रेक घेऊन दुपारचं जेवण करताना दिसत आहेत. त्यावेळी ऐश्वर्या यांनी त्यांच्या डब्याचा व्हिडीओ दाखवला आहे. या व्हिडीओत ऐश्वर्या यांनी भाकरी, वांग्याचं भरीत, कोशींबीर, मटकीची उसळ असे पदार्थ डब्यात आणलेले दिसत आहेत.
ऐश्वर्या यांनी या व्हिडीओवर स्टे फिट अँड स्टे हेल्दी असं कॅप्शन दिलेलं दिसतंय. पन्नाशीत सुद्धा ऐश्वर्या यांचा जबरदस्त फिटनेस पाहून चाहते कौतुक करत आहेत. ऐश्वर्या या सध्या 'सातव्या मुलीची सातव्या मुलगी' मालिकेत अभिनय करत आहेत. ऐश्वर्या यांच्या मालिकेतील भूमिकेला लोकांचं चांगलंच प्रेम मिळतंय. ऐश्वर्या यांचे पती अविनाश नारकर (Avinash Narkar) सुद्धा लोकप्रिय अभिनेते असून ते सध्या सन मराठीवरील 'कन्यादान' मालिकेत अभिनय करत आहेत.