ऐश्वर्या नारकर-तितीक्षा तावडेने ट्रेनमध्ये सेलिब्रेट केली होळी, व्हिडिओ आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 09:44 IST2025-03-14T09:43:54+5:302025-03-14T09:44:31+5:30
तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी चक्क ट्रेनमध्ये होळी सेलिब्रेशन केलं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री सुरुची अडारकरदेखील होती.

ऐश्वर्या नारकर-तितीक्षा तावडेने ट्रेनमध्ये सेलिब्रेट केली होळी, व्हिडिओ आला समोर
होळी हा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. देशभरात ठिकठिकाणी होळी पेटवली जाते. तर रंगांची धुळवड करत हा सण साजरा केला जातो. सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने होळी साजरी करताना दिसतात. अनेक सेलिब्रिटींनी फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा आहेत. मुंबईच्या लोकलमध्येही प्रवासी होळी साजरी करतात. पण, यंदा चक्क मराठी अभिनेत्रींनी ट्रेनमध्ये होळी साजरी केली.
तितीक्षा तावडे आणि ऐश्वर्या नारकर यांनी चक्क ट्रेनमध्ये होळी सेलिब्रेशन केलं आहे. त्यांच्या जोडीला अभिनेत्री सुरुची अडारकरदेखील होती. ऐश्वर्या नारकर यांनी त्यांच्या सोशल मीडियावरुन होळी सेलिब्रेशनचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ऐश्वर्या, तितीक्षा आणि सुरुची होळी साजरी करताना दिसत आहेत. पण, त्यांनी अनोख्या पद्धतीने होळी साजरी केल्याचं पाहायला मिळत आहे. अभिनेत्रींनी रंगांनी नव्हे तर लिप बाम लावत होळी साजरी केली. त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
दरम्यान, तितीक्षा आणि ऐश्वर्या यांनी एकत्र स्क्रीन शेअर केली होती. सातव्या मुलीची सातवी मुलगी मालिकेत त्या एकत्र दिसल्या होत्या. या मालिकेत तितीक्षाने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. तर ऐश्वर्या नारकर या खलनायिकेच्या भूमिकेत होत्या.