'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलामध्ये फुलतंय प्रेमाचं नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2024 17:50 IST2024-12-07T17:49:21+5:302024-12-07T17:50:33+5:30

Navari Mile Hitlerla : 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीला मध्ये नातं फुलताना दिसत आहे.

AJ and Leela are blossoming in love in the serial 'Navari Mile Hitlerla' | 'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलामध्ये फुलतंय प्रेमाचं नातं

'नवरी मिळे हिटलरला' मालिकेत एजे आणि लीलामध्ये फुलतंय प्रेमाचं नातं

'नवरी मिळे हिटलरला' (Navari Mile Hitlerla) मालिकेत एजे आणि लीला मध्ये नातं फुलताना दिसत आहे. लीला तिच्या माहेरी जाते त्यामुळे एजे तिच्यासोबत विश्वजीतला तिची काळजी घेण्यासाठी पाठवतो. ज्यामुळे लीला आनंदात आहे. एजेला लीलाची  खूप आठवण येतेय आणि तो तिच्या काळजीत आहे. लीलाला वाटतंय एजेने पाठवलेले लेटर हे प्रेमपत्रच आहे. कामानिमित्त लीला आणि एजे हॉटेलमध्ये एकत्र येतात, जिथे त्यांच्या नात्यात जवळीक निर्माण होते. 

एजे लीलाच्या कामकारण्याच्या पद्धतीवर खुश होतो. लीला चांगले काम करून एजेला प्रभावित करण्याचा प्रयत्न करते. दरम्यान, कंपनीत फसवणुकीच्या अफवा पसरतायत. लीला घोटाळा पकडण्यासाठी ऑफिस सोडते, ज्यामुळे एजे चिंतेत आहे. फसवणुकीचा तपास सुरू असताना, लीला फसवणुकीचा पर्दाफाश करते यात मुख्य संशयित प्रामोद आणि विराज आहेत. एजे त्यांच्या या कृत्यामुळे प्रचंड संतापतो. लीला विराज आणि प्रमोदच्या बाजूने चर्चा करते. प्रमोद आणि विराज यांचे मत आहे की लीलाने घरी परत यायला हवं. एजे लीलाच्या कामगिरीवर प्रचंड खुश आहे. त्याने दाखवलेल्या काळजीमुळे लीलाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण होतो. 


प्रमोद आणि विराजच्या आग्रहावरून पुन्हा एकदा मतदान होते आणि लीला परत जाहगिरदारांच्या घरी येते. दुसरीकडे, विक्रांतला तुरुंगातून सोडण्यात येते, आणि तो लीलाला पुन्हा खाली खेचण्याचा प्रयत्न करणार आहे. आता लीलाकडे घराच्या चाव्या आहेत ज्यामुळे दुर्गाचा अहंकार दुखावतो. आता काय असेल विक्रांतचा नवीन डाव? अहंकार दुखावल्यामुळे काय असेल दुर्गाचा नवीन प्लॅन? एजे आणि लीला मध्ये खरंच प्रेमाचं नातं निर्माण होईल? हे पाहणे कमालीचे ठरेल.

Web Title: AJ and Leela are blossoming in love in the serial 'Navari Mile Hitlerla'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.