'अजूनही बरसात आहे' मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2021 12:17 PM2021-07-26T12:17:51+5:302021-07-26T12:18:33+5:30

अजूनही बरसात आहे मालिकेतील या कलाकाराने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आपले दुःख व्यक्त केले आहे.

Ajunahi Barsaat aahe fame actor's grandfather passed away | 'अजूनही बरसात आहे' मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

'अजूनही बरसात आहे' मालिकेतील या कलाकारावर कोसळला दुःखाचा डोंगर

googlenewsNext

सोनी मराठी वाहिनीवर अजूनही बरसात आहे ही मालिका नुकतीच दाखल झाली आहे. या मालिकेत उमेश कामत आणि मुक्ता बर्वे मुख्य भूमिकेत आहेत. या मालिकेला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे. या मालिकेतील सुहिता थत्ते, राजन ताम्हाणे, समिधा गुरू, शर्मिला शिंदे, उमा सरदेशमुख या कलाकारांच्या मालिकेतील भूमिकादेखील प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. दरम्यान या मालिकेत मल्हारची भूमिका साकारणारा अभिनेता संकेत कोर्लेकर याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्याच्या आजोबांचे निधन झाल्याचे सांगितले आहे.

संकेत कोर्लेकर याने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर आजोबांसोबत फोटो शेअर करत लिहिले की, भाऊ आजोबा म्हणजे आईचे वडील.. देवाघरी गेले.. कधी वाटलंच नव्हतं की हसत हसत काढलेला आमचा हा सेल्फी शेवटचा असेल.माझे खूप लाडके आजोबा.. कायम आपल्या कामाप्रती प्रामाणिक.आईलाही त्यांनी कायम हीच शिकवण दिली की आपण जे काम करतोय त्या जागेला मंदिर समजून तिथल्या कामाप्रती प्रामाणिक राहायचे. चार दिवसांपूर्वी मी आईला म्हणालो की सीरिअलमध्ये महत्वाचे सीन सुरु आहेत म्हणून मी इतक्यात रोह्याला येऊ शकत नाही. 


त्याने पुढे म्हटले की, परवा आजोबा देवाघरी गेले आणि माझं इथे दुर्लक्ष होऊ नये म्हणून आईने ही गोष्ट माझ्यापासून दोन दिवस लपवली आणि दुःख कितीही मोठे असले तरी पहिले काम ही भाऊ आजोबांचीच शिकवण आईने मला दिली. काल रात्री तिने सांगितले तेव्हा आजोबांसोबच्या सगळ्या आठवणी डोळ्यासमोरून जाऊ लागल्या. खूप वाईट वाटले. पण करत असलेल्या शूटमध्ये दुःख सावरण्याचे बळ मिळाले. आजोबा..लव्ह यू. 

Web Title: Ajunahi Barsaat aahe fame actor's grandfather passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.