विघ्नहर्ता गणेशसाठी आकांक्षा पुरीने तब्बल इतके तास केले चित्रीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 13:06 IST2018-10-15T13:05:11+5:302018-10-15T13:06:31+5:30
देवी पार्वतीचे अनेक अवतार आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या आगामी ट्रॅकमध्ये आकांक्षा नवदुर्गा म्हणजेच नऊ वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. त्याच्या प्रोमो शूटसाठी तिचे नऊ अवतार शूट करणे आवश्यक होते आणि निर्मात्यांना ते अगदी कमी कालावधीत पूर्ण करायचे होते. त्यामुळे आठ ते दहा मेकअपमन आणि तंत्रज्ञांची संपूर्ण टीमने हे आव्हान स्वीकारले.

विघ्नहर्ता गणेशसाठी आकांक्षा पुरीने तब्बल इतके तास केले चित्रीकरण
छोट्या पडद्यावर काम करणाऱ्या कलाकारांना दिवसातील कित्येक तास चित्रीकरण करावे लागते. कधी कधी तर दिवसातील बारा तास देखील ते चित्रीकरण करतात. त्यांना चित्रीकरणाच्या वेळी एक मिनिट देखील वेळ मिळत नाही. हे कलाकार प्रचंड मेहनत घेत असतात. छोट्या पडद्यावरील एका कलाकाराने तर नुकतेच तब्बल ४८ तास सलग चित्रीकरण केलेय.
आपण कलाकारांच्या अशा बऱ्याच कहाण्या ऐकल्या असतील ज्यात कलाकारांनी अखंड परिश्रमाने आणि स्वत:तील अत्युच्च कार्यक्षमतेचे प्रदर्शन करून स्क्रीनवर सर्वोत्कृष्ट काम केले आहे. या यादीत सोनी एंटरटेंमेंट वाहिनीवरील ‘विघ्नहर्ता गणेशा’मध्ये पार्वतीची भूमिका करणाऱ्या आकांक्षा पुरीचे नाव देखील सामील झाले आहे. तिने नुकतेच नवदुर्गा ट्रॅकच्या प्रोमो शूटसाठी थेट 48 तासांपर्यंत सलग शूट केले.
देवी पार्वतीचे अनेक अवतार आहेत. विघ्नहर्ता गणेशाच्या आगामी ट्रॅकमध्ये आकांक्षा नवदुर्गा म्हणजेच नऊ वेगवेगळ्या रूपात दिसणार आहे. त्याच्या प्रोमो शूटसाठी तिचे नऊ अवतार शूट करणे आवश्यक होते आणि निर्मात्यांना ते अगदी कमी कालावधीत पूर्ण करायचे होते. त्यामुळे आठ ते दहा मेकअपमन आणि तंत्रज्ञांची संपूर्ण टीमने हे आव्हान स्वीकारले. शुटींग सुरू झाल्यानंतर संपूर्ण टीमने झोकून देऊन काम केले आणि आकांक्षाला तयार होण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल याकडे पहिले. या मालिकेच्या टीमसाठी हा खूपच छान अनुभव होता. याबाबत विघ्नहर्ता गणेश या मालिकेत मुख्य भूमिकेत असणाऱ्या आकांक्षा पुरीशी संपर्क साधला असता तिने या वृत्ताला दुजोरा दिला, ती सांगते, "हा एक उत्कृष्ट अनुभव होता. सगळ्या टीमने यासाठी जोमाने काम केले. आम्ही ४८ तासात नऊ वेगवेगळी रूपं यशस्वीरित्या साकारली. ज्यात नवदुर्गाचा आगामी ट्रॅकसुद्धा होता. मी खरोखर आनंदी आहे की, मला पार्वतीचे पात्र निभावता आले. कोणत्याही इतर मालिकेने एखाद्या अभिनेत्रीला इतकी मौल्यवान संधी दिली नसती. आमच्या विघ्नहर्ता गणेश या मालिकेला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे आणि मी आशा करते की या मालिकेला रसिकांचे असेच प्रेम कायम मिळत राहील."