‘पौरुषत्वा’ची खरी व्याख्या दर्शविण्यासाठी अखिलेश पांडेसह 'बढो'ची दंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2018 11:22 AM2018-01-10T11:22:18+5:302018-01-10T16:52:18+5:30

महासंगम आणि महा-एपिसोड्स हे नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतात.टेलिव्हिजनवर अधिक मनोरंजन निर्माण करण्यासाठी दोन प्रसिद्ध मालिका आणि त्यांचे वेगळे जग ...

Akhilesh Pandey's 'Bigow' riots show the true definition of 'Parurusha' | ‘पौरुषत्वा’ची खरी व्याख्या दर्शविण्यासाठी अखिलेश पांडेसह 'बढो'ची दंगल

‘पौरुषत्वा’ची खरी व्याख्या दर्शविण्यासाठी अखिलेश पांडेसह 'बढो'ची दंगल

googlenewsNext
ासंगम आणि महा-एपिसोड्स हे नेहमीच प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरतात.टेलिव्हिजनवर अधिक मनोरंजन निर्माण करण्यासाठी दोन प्रसिद्ध मालिका आणि त्यांचे वेगळे जग एकत्र येतात तेव्हा बघण्यात अजून मजा येते.'मेरी हानिकारक बीवी' आणि 'बढो बहू' हाच अनुभव प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे.मेरी हानिकारक बीवी या मालिकेत भारतीय समाजात सहसा न बोलला गेलेला नसबंदी हा विषय मांडून सर्व प्रकारच्या रुढी परंपरा मोडीत काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर, आपल्या कुस्तीच्या माध्यमातून पतीचे मन जिंकण्यासाठी अनेक प्रयत्न करत राहणाऱ्या १०० किलो वजनाच्या बहूची कहाणी बढो बहूमध्ये आहे.प्रेक्षकांचा अनुभव अधिक समृद्ध करत, महासंगमच्या या भागात बढो (रिताशा राठोड) प्रशिक्षणाकरिता मुंबईकडे निघणार असल्याचे बघायला मिळेल. शहरात आल्यानंतर, तिची भेट अखिलेश (करण सूचक)शी होते. केवळ वडील होणे म्हणजे खरे पौरुषत्व नव्हे हे कुस्तीच्या सामान्यात आव्हान मिळालेली बढो अखिलेशला जाणवून देते.सकारात्मक दृष्टिकोनासह आयुष्यातील आव्हाने आणि अडचणींना सामोरे जाणे म्हणजेच खरे पौरुषत्व हे ती त्याच्या लक्षात आणून देते.शिवाय इराला (जिया शंकर) अभिषेकबद्दल नेमकं काय वाटतंय, हे ती इराच्या लक्षात आणून देईल आणि इराने अखिलेशसाठी काहीतरी करावे, असे सुचवेल.

बढोबरोबर त्याच्या भांडणाबद्दल विचारले असता, अभिनेता करण सूचकने सांगितले,“रिताशाबरोबर तिच्या बढो या व्यक्तिरेखेसोबत काम करण्याचा अनुभव फारच छान होता.बबिता फोगटबरोबर आताच तिने कुस्तीचा संपूर्ण सिक्वेन्स शूट केला होता हे मला माहीत आहे आणि तिला अशा प्रकारे काम करताना पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे.आमच्या दोन्ही मालिकांमध्ये आम्ही दोघेही कुस्तीवीरांची भूमिका साकारत असल्यामुळे आम्ही एकमेकांशी या विषयावर बोललो आणि आमचे काम अधिक चांगले व्हावे यासाठी एकमेकांना सल्लेदेखील दिले.”याबद्दल रिताशाने सांगितले, “मेरी हानिकारक बीवीच्या टीमबरोबर शूटिंग करण्याचा अनुभव फारच मजेशीर होता. या मालिकेचा गाभा वेगळा असल्यामुळे बढो बहूपेक्षा फारच वेगळा अनुभव होता.टीममधल्या प्रत्येकाचा विनोदाचा टायमिंग मस्तच आहे आणि या विनोदी मालिकेत सहभागी होऊन मी खूप मजा केली.”

Web Title: Akhilesh Pandey's 'Bigow' riots show the true definition of 'Parurusha'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.