अक्षयाने दिली प्रेमाची कबुली; 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत शेअर केला video
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2022 18:05 IST2022-05-11T18:04:37+5:302022-05-11T18:05:39+5:30
Akshaya Deodhar: साखरपुड्यानंतर अक्षयाने मध्यंतरी हार्दिकसाठी एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला होता.त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने हार्दिकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे.

अक्षयाने दिली प्रेमाची कबुली; 'तुझ्यात जीव रंगला' म्हणत शेअर केला video
'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय जोडी म्हणजे हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर. या मालिकेत राणादा आणि अंजली ही भूमिका साकारुन या दोघांनी चांगलीच लोकप्रियता मिळवली. विशेष म्हणजे त्यांची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यातही एकत्र यावी अशी चाहत्यांची प्रचंड इच्छा होती. अखेर चाहत्यांचं ही इच्छा पूर्ण झाली. खऱ्या आयुष्यात हार्दिक आणि अक्षयाने साखरपुडा करुन नेटकऱ्यांना आनंदाचा धक्का दिला.
अक्षया आणि हार्दिक यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या साखरपुड्याचे काही फोटो व व्हिडीओ शेअर केले. विशेष म्हणजे हे फोटो सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरलही झाले. साखरपुड्यानंतर अक्षयाने मध्यंतरी हार्दिकसाठी एक स्पेशल व्हिडीओ शेअर केला होता.त्यानंतर आता पुन्हा एकदा तिने हार्दिकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. सोबतच तुझ्यात जीव रंगला म्हणत तिने कॅप्शन दिली आहे.
दरम्यान, अक्षयाने तुझ्यात जीव रंगला असं म्हणत त्यांच्या साखरपुड्याचे काही हाइलाइट्स शेअर केले आहेत. या व्हिडीओमध्ये साखरपुड्यातील अक्षया-हार्दिकचे काही खास क्षण असल्याचं दिसून येत आहे. आतापर्यंत अक्षयाने साखरपुड्यातील अनेक फोटो, व्हिडीओ शेअर करत त्याला #अहा असा हॅशटॅग वापरला आहे.