आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2024 10:30 AM2024-07-16T10:30:47+5:302024-07-16T10:31:59+5:30

अक्षय केळकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने आईच्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवल्याचं दिसतंय

Akshay Kelkar is decorated vithu mauli idol from his mother favourite sarees | आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

उद्या आषाढी एकादशी. लाखो वारकरी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले. अनेकजण आज पंढरपूरला पोहोचून विठ्ठल-रुक्मिणीचं दर्शन घेण्यासाठी आतुर आहेत. मराठी कलाकारही उद्या होणाऱ्या आषाढीनिमित्त सोशल मीडियावर विविध पोस्टच्या माध्यमातून पांडुरंगाची भक्ती  करत आहेत. अशातच अभिनेता अक्षय केळकरने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या व्हिडीओचं खूप कौतुक होतंय. आईच्या आवडत्या साड्यांपासून अक्षयने विठ्ठलाच्या मुर्तीला सजवलेलं दिसतंय. 

आईच्या आवडत्या साड्यांपासून 'माऊलीला' सजवलं

अक्षयने सोशल मीडियावर  एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने आईच्या आवडत्या साड्यांचा वापर करुन पांडुरंगाला सजवलेलं दिसत आहे. अक्षयने शेअर केलेला व्हिडीओ पाहून अनेकांनी त्याचं कौतुक केलंय. व्हिडीओ शेअर करत अक्षय लिहितो, "पांडुरंगाला विठू माउली म्हणतात. माझ्या माऊलीच्या म्हणजे माझ्या आईच्या आवडत्या साड्यांपासून माझ्या विठू माऊलीला सजवलं. एरवी साड्यांवर जीवापाड प्रेम करणारी आई मी तिच्या या अत्यंत आवडत्या दोन साड्या मागितल्यावर लगेच दिल्या …. माऊली.. || राम कृष्ण हरी ||"

अक्षय केळकरचं वर्कफ्रंट

अक्षय केळकरने शेअर केलेल्या व्हिडीओवर अनेकांनी हार्ट इमोजी पोस्ट करत सुंदर सुंदर अशा कमेंट केल्या आहेत. अक्षयच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याने 'बिग बॉस मराठी ४' चं विजेतेपद पटकावलं. अक्षयची 'अबीर गुलाल' ही नवी मालिका कलर्स मराठीवर सुरु झालीय. या मालिकेला प्रेक्षकांचं चांगलं प्रेम मिळतंय. अक्षय या मालिकेत अगस्त्य ही भूमिका साकारतोय. ही मालिका दररोज रात्री ८.३० वाजता कलर्स मराठीवर पाहता येईल. 

Web Title: Akshay Kelkar is decorated vithu mauli idol from his mother favourite sarees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.