अक्षय केळकरच्या पोस्टनंतर आता रमानेही दिली प्रेमाची कबुली, खास फोटो शेअर करत म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 11:18 IST2024-12-24T11:17:49+5:302024-12-24T11:18:14+5:30

साधना काकतरने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा गोड फोटो शेअर करत लिहिले...

Akshay kelkar s girfriend sadhana kakatkar shared post expressed her love for actor | अक्षय केळकरच्या पोस्टनंतर आता रमानेही दिली प्रेमाची कबुली, खास फोटो शेअर करत म्हणाली...

अक्षय केळकरच्या पोस्टनंतर आता रमानेही दिली प्रेमाची कबुली, खास फोटो शेअर करत म्हणाली...

'बिग बॉस ४' चा विजेता अभिनेता अक्षय केळकरने (Akshay Kelkar) नुकतीच प्रेमाची कबुली दिली आहे. बिग बॉसमध्ये असताना तो सतत त्याच्या गर्लफ्रेंडचं रमाचं नाव घ्यायचा. मात्र त्याने कधीच तिचा चेहरा दाखवला नव्हता. आता नुकतंच त्याने त्याच्या लाडक्या रमाला जगासमोर आणलं आहे. गीतकार, गायिका साधना काकतकर ही त्याची खरी रमा आहे. दहा वर्षांपासून दोघंही रिलेशनशिपमध्ये आहेत. नुकतंच त्याने साधनासोबत एक सुंदर व्हिडिओ पोस्ट करत प्रेमाची कबुली दिली होती. तर आता साधनानेही अक्षयसाठी खास पोस्ट केली आहे.

साधना काकतरने इन्स्टाग्रामवर अक्षयसोबतचा गोड फोटो शेअर केला आहे.  यासोबत तिने लिहिले, "त्याने मला वचन दिलं, माझी वाट बघितली आणि वचन निभावलं. या नव्या जगात तू तसाच old classic राहिलास त्यासाठी थँक यू. माझी प्रेमकथा इतकी सुंदर केलीस त्याबद्दलही थँक यू. अखेर...हे अधिकृत झालंच. या दिवसाची मनात हजार वेळा कल्पना केली पण हे आणखी जास्त सुंदर आहे. १० वर्ष झाल्यानंतर एवढंच कोतुक करु शकते. अक्षय, गेलास रे आता कामातून."


साधनाच्या या पोस्टवर शरद केळकर, समृद्धी केळकर, गायत्री दातार यांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.  साधना ही गीतकार आणि गायिका आहे. साधनाने गायलेली आणि लिहिलेली गाणी सोशल मीडिया आणि यूट्युबवर प्रसिद्ध आहेत. तिने सावनी रवींद्र, मंगेश बोरगावकर अशा अनेक लोकप्रिय गायकांसोबत काम केलंय. तर अक्षय नुकताच 'अबीर गुलाल' मालिकेत दिसला होता.  अक्षय आणि त्याची रमा म्हणजेच साधना लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. 

Web Title: Akshay kelkar s girfriend sadhana kakatkar shared post expressed her love for actor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.