द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमध्ये दिसणार अक्षय कुमार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2017 10:33 AM2017-07-18T10:33:39+5:302017-07-18T16:03:39+5:30
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन प्रचंड गाजले आहेत. या कार्यक्रमाने कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव, ...
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमाचे आतापर्यंतचे सगळेच सिझन प्रचंड गाजले आहेत. या कार्यक्रमाने कपिल शर्मा, राजू श्रीवास्तव, सुनील पाल, नवीन प्रभाकर, एहसान कुरेशी, व्हीआयपी यांसारखे खूप चांगले कॉमेडियन छोट्या आणि मोठ्या पडद्याला मिळवून दिले आहेत. हा कार्यक्रम आता जवळजवळ 12 वर्षांनी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या कार्यक्रमाच्या नव्या सिझनमध्ये डिजिटल तंत्राचे भान असलेले आणि अस्सल विनोदाचे अंग असलेले नवे कलाकार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजचा नवा सिझन हा 25 भागांचा असून या कार्यक्रमाद्वारे विनोदी कलाकारांचा शोध घेतला जाईल.
द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज या कार्यक्रमात शेखर सुमन आणि नवज्योत सिंग सिद्धू यांनी परीक्षकाची भूमिका बजावली होती. आता या कार्यक्रमात नवे परीक्षक पाहायला मिळणार आहेत. अक्षय कुमार या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार असल्याचे समजतंय. त्याचसोबत झाकीर खान आणि हुसेन दलाल परीक्षकाच्या खुर्चीत बसलेले दिसणार आहेत. यांच्यासोबतच आणखी एका महिला परीक्षकाची निवड करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. या कार्यक्रमाविषयी झाकिर सांगतो, मी या कार्यक्रमात परीक्षकाची भूमिका साकारणार आहे. कॉमेडी करणे हे मला खूप आवडते. पण त्याचे व्यवसायिक कारकिर्दीत रूपांतर करणे हे माझ्यासाठी आव्हानात्मक आहे. आपल्या विनोदी कलागुणांची झलक सादर करण्यासाठी या कार्यक्रमामुळे स्पर्धकांना एक चांगले व्यासपीठ मिळाले आहे. पंचलाइन आणि सादरीकरण अशा दोन गोष्टींचा कॉमेडीत समावेश असतो असे मला वाटते. त्यामुळे परीक्षण करताना मी या दोन गोष्टींचा नक्कीच विचार करणार आहे.
Also Read : अक्षय कुमार आणि मौनी रॉय यांच्या चित्रपटाच्या सेटवरील फोटो लीक!