'करिअरची सुरुवात साक्षात स्वामींच्या भूमिकेनं व्हावी ही खरंतर...', अक्षय मुडावदकरने व्यक्त केली भावना
By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2023 05:07 PM2023-05-09T17:07:48+5:302023-05-09T17:08:13+5:30
Jai Jai Swami Samarth : जय जय स्वामी समर्थ या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे.
कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ' (Jai Jai Swami Samarth) या मालिकेला संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या बाहेरून देखील रसिक प्रेक्षकांचे उदंड प्रेम लाभत आहे. मालिकेचे ७५० हून अधिक भाग आता पूर्ण झाले आहेत. या मालिकेत स्वामी समर्थची भूमिका अभिनेता अक्षय मुडावदकरने साकारला आहे. नुकताच त्याने मालिकेतील आपला प्रवास सांगितला.
अक्षय मुडावदकर मालिकेच्या प्रवासाबद्दल म्हणाला की, ७५० हून अधिक भाग,२.५ वर्षांचा प्रवास, अगणित अनुभव, मोठ्यांचे आशीर्वाद,लहानंच प्रेम...आणि स्वामी आजोबा म्हणून येणारी हाक......कधी स्वप्नात सुद्धा विचार नव्हता केला की आपल्या वाट्याला हे सगळं येईल...खरं तर ह्या पैकी फक्त १-२ गोष्टी जरी एक कलाकार म्हणून मिळाल्या असत्या तरी मी खुश असतो..मात्र आज स्वामी कृपेने इतकं मिळालंय की हे लिहतांना सुद्धा आनंदाश्रू अनावर होतात.असा एक दिवस जात नाही ज्या दिवशी मी घराबाहेर पडलो आणि कोणी येऊन भेटलं नाही.. कधी लहान मुलं, कधी आजी आजोबा,तर कधी कॉलेज ला जाणारी मुलं.. हॉस्पिटल असो..रेल्वे स्टेशन असो..किंवा एअरपोर्ट... प्रत्येक ठिकाणी जिथे कुठे प्रेक्षक भेटतील मनापासून प्रेम दाखवतात...खरं तर हे सगळं माझ्या साठी नसून स्वामींकरता आहे हे ही मे जाणतो.
तो पुढे म्हणाला की, काय आणि किती बोलू...सगळं सगळं दिलंय स्वामींनी...एक कलाकार म्हणून जे जे हवं असतं ते सगळं दिलंय...ओळख, प्रसिद्धी,मान आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काम करण्याच समाधान. आज माझ्या करिअरची सुरुवात साक्षात स्वामींच्या भूमिकेने व्हावी हा खरंतर मी माझ्या पुढील प्रवासा करिता मिळालेला स्वामींचा आशीर्वाद समजतो आणि त्यांच नाव घेऊन पुढील प्रवासाची सुरुवात करतो...एव्हढच म्हणींन की मी फक्त एक कलाकार आहे जो स्वामींच्या भूमिकेतून त्यांच्या लीला तुम्हा सगळ्यां पर्यंत पोहचवण्याचा फक्त प्रयत्न करतोय...तेव्हा "स्वामींवर श्रद्धा आणि माझ्यावर प्रेम असंच कायम असु द्या"