Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : अखेर राणादा आणि पाठकबाई अडकले लग्नबेडीत!, फोटो आले समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 12:26 PM2022-12-02T12:26:20+5:302022-12-02T12:26:40+5:30
Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला.
अखेर ज्या दिवसाची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते, तो दिवस आला. आज तुझ्यात जीव रंगला मालिकेतून घराघरात पोहचलेली लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठक बाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) आणि अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आज (२ डिसेंबर २०२२) विवाहबंधनात अडकले आहेत. त्यांचे आज पुण्यात लग्न पार पडले आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडला. पुण्यातील सिद्धी गार्डन या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडला. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
लग्नाच्या विधीच्या वेळी अक्षया आणि हार्दिक पारंपारिक वेशात पाहायला मिळाले. अक्षयाने लाल रंगाची नववारी साडी, कपाळावर चंद्राची कोर, नाकात नथ, आंबाडा आणि गळ्यात साजेसा नेकलेस घातलेला पाहायला मिळाला. या लूकमध्ये वधू खूपच सुंदर दिसते आहे. तर हार्दिकने बेज रंगाचा कुर्ता आणि त्याखाली लाल रंगाचे धोतर नेसले आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षांच्या माळांचा नेकपीस घातला आहे. तो राजेशाही अंदाजात दिसतो आहे. त्यांच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये नवरा बायको झाले आहेत.