Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : राणादा आणि पाठकबाईंचा लग्नात शाही थाट!, अक्षया आणि हार्दिकच्या लग्नातील लूक आला समोर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 10:57 IST2022-12-02T10:57:02+5:302022-12-02T10:57:24+5:30
Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding: अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांचे आज पुण्यात लग्न पार पडत आहे. दरम्यान आता त्या दोघांच्या लग्नातील लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.

Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : राणादा आणि पाठकबाईंचा लग्नात शाही थाट!, अक्षया आणि हार्दिकच्या लग्नातील लूक आला समोर
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी राणादा आणि पाठकबाई अखेर आज लग्नबेडीत अडकले आहेत. आज म्हणजेच २ डिसेंबर, २०२२ रोजी अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांचे पुण्यात लग्न पार पडत आहे. दरम्यान आता अक्षया आणि हार्दिकच्या लग्नातील लूक सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. यात त्यांचा शाही अंदाज पाहायला मिळत आहे.
अक्षया देवधर आणि हार्दिक जोशीचा लग्नसोहळा पुण्यातील सिद्धी गार्डन या ठिकाणी अगदी शाही अंदाजात पार पडतो आहे. या लग्नसोहळ्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत. लग्नाच्या विधीच्या वेळी अक्षया आणि हार्दिक शाही अंदाजात पाहायला मिळाले.
अक्षया देवधरने लाल रंगाची नववारी साडी, कपाळावर चंद्राची कोर, नाकात नथ, आंबाडा आणि गळ्यात साजेसा नेकलेस घातलेला पाहायला मिळतोय. या लूकमध्ये ती खूपच सुंदर दिसते आहे. तर रांगड्या हार्दिकने बेज रंगाचा कुर्ता आणि त्याखाली लाल रंगाचे धोतर नेसले आहे. त्याने गळ्यात रुद्राक्षांची माळ घातली आहे. तो राजेशाही अंदाजात दिसतो आहे. त्यांच्या या लूकला चाहत्यांची खूप पसंती मिळताना दिसते आहे.
राणादा आणि पाठकबाई ही जोडी छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरली होती. रिल लाईफमधली ही जोडी आता रिअल लाईफमध्ये नवरा बायको झाले आहेत.