Akshaya Deodhar : नववधू अक्षयाच्या एक नाही तर अनोखी डिझाईन असलेल्या चार मंगळसूत्रांची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 07:04 PM2022-12-05T19:04:27+5:302022-12-05T19:04:53+5:30
Akshaya Deodhar And Hardik Joshi : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबर रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली आहे.
अभिनेत्री अक्षया देवधर (Akshaya Deodhar) आणि अभिनेता हार्दिक जोशी (Hardik Joshi) यांनी २ डिसेंबर रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली आहे. त्यांच्या लग्नांची मराठी इंडस्ट्रीत बरीच चर्चा होती आणि चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकताही होती. अखेर अक्षया-हार्दिकने पारंपरिक पद्धतीत लग्नगाठ बांधली. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होतायेत. त्यांच्या लग्नाच्या फोटोंसोबतच सध्या आणखी एका गोष्टीची चर्चा आहे ती म्हणजे नववधू अक्षयाच्या मंगळसूत्रांची... अक्षयाने तिच्या लग्नात एक नाही तर चार मंगळसूत्र घातले होते.
पहिलं मंगळसूत्र म्हणजे लग्नात हार्दिकने अक्षयाच्या गळ्यात विधीनिशी घातलेले मंगळसूत्र... दोन वाट्यांच्या डिझाईनचं पारंपरिक पद्धतीचं तिचं हे मंगळसूत्र आहे. लग्नात या दोन वाट्यांमध्ये हळदी-कुंकू भरून हार्दिक हे मंगळसूत्र अक्षयाच्या गळ्यात घालताना दिसून आला. तर दुसरं मंगळसूत्र म्हणजे अक्षयाचं छोटं मंगळसूत्र... अक्षयाचं छोटं मंगळसूत्र हे डायमंडचं आहे.
अक्षयाचं तिसरं मंगळसूत्र म्हणजे तिचा मुहूर्तमणी आहे. सिंगल काळे मणी आणि मधोमध एक छोटा सोन्याचा मणी... याशिवाय अक्षयाचं चौथं मंगळसूत्र तिच्या गळ्यांतलं आणखी एक छोटं मंगळसूत्र आहे... पण हे दुसरं छोटं मंगळसूत्र काळ्या मण्यांनी भरलेलं आणि त्यामध्ये सुर्याचं छोटं पेंडंट दिसून येते आहे. खरंतर या छोट्या मंगळसूत्राने सर्वांचच लक्ष वेधून घेतले आहे. हे चारही मंगळसूत्र अक्षयानेने तिच्या लग्नाला घातले होते. अक्षया या सगळ्या मंगळसूत्रांमध्ये खूपच सुंदर आणि शोभून दिसत होती.