Exclusive Interview : होणाऱ्या सासरी पहिल्यांदाच बाप्पाच्या दर्शनाला आली अक्षया, हार्दिकने घेतला धम्माल उखाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2022 17:19 IST2022-09-05T17:16:28+5:302022-09-05T17:19:26+5:30
Hardeek Joshi , Akshaya Deodhar : होय, बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षया होणाऱ्या सासरी पोहोचली. यावेळी अक्षया व हार्दिक दोघांनीही बाप्पाचे आशीर्वाद घेतले. सोबत ‘लोकमत फिल्मी’सोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्यात

Exclusive Interview : होणाऱ्या सासरी पहिल्यांदाच बाप्पाच्या दर्शनाला आली अक्षया, हार्दिकने घेतला धम्माल उखाणा
हार्दिक जोशी (Hardeek Joshi) व अक्षया देवधर ( Akshaya Deodhar) ही छोट्या पडद्यावरची लोकप्रिय जोडी लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. लग्नाची तयारी सुरू झाली आहे. पण त्याआधी होणाऱ्या सासरच्या बाप्पाचं दर्शनं तर घ्यायलाच हवं. होय, बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षया होणाऱ्या सासरी पोहोचली. यावेळी अक्षया व हार्दिक दोघांनीही बाप्पाचे आशीर्वाद घेतले. सोबत ‘लोकमत फिल्मी’सोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्यात. यावेळी हार्दिकने आपल्या होणाऱ्या बायकोसाठी मस्तपैकी उखाणाही घेतला...
यावर्षीचा बाप्पा किती खास आहे?
साखरपुड्यानंतर आम्ही दोघं पहिल्यांदा एकत्र गणेशोत्सव साजरा करतोय. मी पहिल्यांदाच यावेळी हार्दिककडे गणपतीसाठी आले आहे. होणाऱ्या नवऱ्याच्या घरच्या बाप्पाच्या दर्शनसाठी पहिल्यांदा आले असल्यामुळे साहजिकच यंदाचा बाप्पा खास आहे, असं अक्षया म्हणाली.
यावर्षी बाप्पाकडे काय मागितलं?
सर्वांचं आरोग्य चांगलं राहावं, एवढंच मी बाप्पाकडे मागते, असं अक्षया म्हणाली. हार्दिकने बाप्पाकडे एकच मागणं मागितलं, ते म्हणजे, सगळ्यांच्या पाठी राहा. मी बाप्पाकडे काहीच मागत नसतो. सगळ्यांच्या इच्छा पूर्ण कर, सगळ्यांच्या पाठी राहा, सगळ्यांना आनंदी ठेव... आपण प्रामाणिकपणे काम केलं की बाप्पा नेहमीच पाठी असतो. प्रामाणिकपणे काम करण्याची ताकद सगळ्यांना दे, एवढंच मी मागेल, असं हार्दिक म्हणाला.
अक्षयाने घेतला होणाऱ्या बायकोसाठी उखाणा...
गणपतीला वाहतोय मी दुर्वा, अक्षया म्हणते माझे लाड पुरवा..., असा मस्त उखाणा हार्दिकने अक्षयासाठी घेतला.