'पुन्हा कर्तव्य आहे'च्या सेटवर आहेत अक्षयाचे अन्नदाते, जाणून घ्या कोण आहेत ?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:59 AM2024-04-24T11:59:40+5:302024-04-24T12:00:06+5:30

Akshaya Hindalkar : 'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) या मालिकेत वसू म्हणजेच वसुंधराची भूमिका अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिने साकारली आहे.

Akshaya Deodhar's foodies are on the set of 'Punha Kartavya Aahe', know who they are? | 'पुन्हा कर्तव्य आहे'च्या सेटवर आहेत अक्षयाचे अन्नदाते, जाणून घ्या कोण आहेत ?

'पुन्हा कर्तव्य आहे'च्या सेटवर आहेत अक्षयाचे अन्नदाते, जाणून घ्या कोण आहेत ?

'पुन्हा कर्तव्य आहे' (Punha Kartavya Aahe) या मालिकेने कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळतो आहे. या मालिकेतील आकाश आणि वसूची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावताना दिसते आहे. मालिकेत सध्या आकाश आणि वसूमध्ये प्रेम फुलताना दिसत आहे. या मालिकेत वसू म्हणजेच वसुंधराची भूमिका अभिनेत्री अक्षया हिंदळकर हिने साकारली आहे. दरम्यान तिने या मालिकेच्या सेटवर आपली माणसे मिळाल्याचे सांगितले आहे.

मालिकांच्या शूट शेड्युल असे असते की कलाकार घरापेक्षा जास्त वेळ सेटवर व्यतित करतो. हे सर्व  कलाकार  एकत्र  शूट  करतात, हसतात, खेळतात, एकत्र  जेवतात. तसेच एकमेकांची एखाद्या कुटुंबासारखी  काळजी  घेतात. घरापासून शूट लोकेशन  दूर असल्यामुळे अक्षयाला  घरातून  जेवणाचा  डब्बा  नेहमी आणणे शक्य  होत  नाही. अशावेळी  सेटवर  तिचे  अन्नदाता  तिची  काळजी  घेतात असं अक्षयाने सांगितले.

आपल्या सेटवरच्या अन्नदातां बद्दल बोलताना ती म्हणाली की,"मी नवी मुंबईला राहते म्हणून घरातून जेवण आणणे खूप क्वचितच होते. जेव्हा सुट्टी असते किंवा लेटचा कॉल टाइम असेल तेव्हा मी घरातून डब्बा घेऊन येते. पण जर माझा डब्बा नसेल तर मालिकेत माझी आई शमा निनावणेकर आणि अक्षय हे दोघे घरातून डब्बा आणतात. हे दोघेही माझे अन्नपूर्णा आहेत. ते नेहमी माझ्यासाठी ही डब्बा आणतात आणि तो मी खाते. मला खूप छान वाटते की माझ्या वाटणीचेही ते जेवण घेऊन येतात." 
 
 

Web Title: Akshaya Deodhar's foodies are on the set of 'Punha Kartavya Aahe', know who they are?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.