भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2024 12:37 PM2024-06-24T12:37:41+5:302024-06-24T12:41:02+5:30

अभिनेत्रीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढत केस हवेत उडवताना ती दिसत आहे.

akshaya hindalkar putting head out of moving vehicle made reel video netizens troll her | भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

भर रस्त्यात गाडीतून डोकं बाहेर काढत मराठी अभिनेत्रीची स्टंटबाजी, व्हिडिओ पाहून भडकले नेटकरी, म्हणाले...

'पुन्हा कर्तव्य आहे' ही झी मराठीवरील लोकप्रिय मालिका आहे. अलिकडेच सुरू झालेल्या या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. या मालिकेत अभिनेत्री अक्षया हिंदळकर मुख्य भूमिका साकारत आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत ती वसुंधराच्या भूमिकेत आहे. अक्षया सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. नवीन प्रोजेक्टबरोबरच अनेकदा ती तिचे फोटोही शेअर करताना दिसते. सध्या अक्षयाच्या एका व्हिडिओची चर्चा रंगली आहे. 

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्रामवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. मुंबईतील रस्त्यावर एक व्हिडिओ तिने बनवला आहे. या व्हिडिओत चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढत केस हवेत उडवताना अक्षया दिसत आहे. त्यानंतर दोन्ही हातही बाहेर काढून अक्षयाने रील बनवल्याचं पाहायला मिळत आहे. "Where to miss??? Take me to the stars", असं कॅप्शन या व्हिडिओला तिने दिलं आहे. त्याबरोबरच तिने "हा व्हिडिओ शूट करताना पूर्ण काळजी घेतली आहे" असंही म्हटलं आहे. पण, अक्षयाचा हा व्हिडिओ पाहून नेटकरी भडकले आहेत. 

गाडीतून डोकं बाहेर काढत स्टंटबाजी केल्याने अक्षयाला चाहत्यांनीही सुनावलं आहे. या व्हिडिओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे. "चालत्या गाडीतून डोकं बाहेर काढू नये", "काळजी घे...आयुष्य जास्त महत्त्वाचं आहे", "काय करतेस...तुला दुखापत झाली तर", "हे खूप घातक आहे...जर तू कॅमेऱ्यामध्ये कैद झालीस तर फसशील उगाच", "तुझ्यासारख्या जबाबदार मुलीकडून हे अपेक्षित नाही...तुला हे समजेल अशी आशा आहे", असं म्हणत अक्षयाला नेटकऱ्यांनी सुनावलं आहे. 

अक्षयाने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. इश्काचा नादखुळा मालिकेत ती मुख्य भूमिकेत होती. सध्या ती पुन्हा कर्तव्य आहे मालिकेतून प्रेक्षकांची मनं जिंकत आहे. 'पुन्हा कर्तव्य आहे' मालिकेत नुकतंच वसुंधरा आणि आकाश यांचं लग्न पार पडलं आहे. ही मालिका सध्या रंजक वळणावर आहे. आकाश आणि वसुंधराने त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे. ठाकूर घराण्यात सामावून घेताना आणि चिनू मिनूला सांभाळताना वसुंधराची दमछाक होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: akshaya hindalkar putting head out of moving vehicle made reel video netizens troll her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.