​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर सांगतेय, माझ्याबद्दलची ही माहिती पूर्णपणे चुकीची

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2017 10:53 AM2017-09-21T10:53:48+5:302017-09-21T16:23:48+5:30

तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षया देवधर ही घराघरात पोहोचली. तिने साकारलेली अंजलीबाईची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आज ...

Akshaye Deodhar tells us that you have lost your life in this series. This information about me is completely false. | ​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर सांगतेय, माझ्याबद्दलची ही माहिती पूर्णपणे चुकीची

​तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील अंजलीबाई म्हणजेच अक्षया देवधर सांगतेय, माझ्याबद्दलची ही माहिती पूर्णपणे चुकीची

googlenewsNext
झ्यात जीव रंगला या मालिकेमुळे अक्षया देवधर ही घराघरात पोहोचली. तिने साकारलेली अंजलीबाईची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. आज प्रेक्षक तिला अंजली या नावानेच ओळखतात. अक्षयाने या आधी काही नाटकांमध्ये काम केले होते. तसेच सुजय डहाकेच्या शाळा या चित्रपटात देखील ती झळकली होती. पण तिची छोट्या पडद्यावर झळकण्याची ही पहिलीच वेळ असून तिला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळत आहे. 
एखादा कलाकार प्रसिद्ध झाला की, त्या कलाकाराने याआधी काय काय केले होते, तो कलाकार कोणत्या शहरातून आला आहे हे जाणून घेण्याची इच्छा सर्वसामान्य लोकांना नक्कीच असते. त्यामुळे ते आपल्या आवडत्या कलाकाराविषयी विविध माध्यमांमधून माहिती गोळा करत असतात. कोणत्याही कलाकाराविषयी माहिती मिळवण्यासाठी सोशल मीडिया, गुगल हे पर्याय ते निवडतात. पण या ठिकाणीच जर कलाकारांविषयी चुकीची माहिती छापलेली असेल तर चुकीचीच माहिती लोकांपर्यंत पोहोचते आणि लोक तीच माहिती बरोबर आहे असा समज करून घेतात. ती माहिती बरोबर आहे की नाही याची शहानिशा केली जावी असे देखील त्यांना वाटत नाही. कधीकधी या गोष्टीचा मनस्ताप देखील या कलाकारांना सहन करावा लागतो.
अक्षया देवधर ही मुळची पुण्याची असून निपुण धर्माधिकारीच्या नाटक कंपनीसोबत तिने काही नाटकांमध्ये काम केले आहे. 
अक्षया बाबत देखील एक चुकीची माहिती नेटवर आहे. अक्षया ही मटा क्वीन असल्याचे एका वेबसाईटवरील तिच्या बायोडेटा मध्ये म्हटले आहे. ही माहिती पाहून ती खरेच मटा क्वीन होती असे समजून अनेकजण तिला याबाबत प्रश्न विचारतात. पण ही माहिती पूर्णपणे चुकीची असल्याचा खुलासा नुकताच अक्षयाने एबीपी माझाकडे केला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत तिने म्हटले आहे की, मी मटा क्वीन असल्याचे नेटवर सापडत असले तरी ते पूर्णपणे चुकीचे आहे. माझ्याबद्दल हे कोणी छापले आहे हे मला माहीतच नाहीये.  

Also Read : तुझ्यात जीव रंगला मालिकेतील अंजलीबाई राणाला नव्हे तर या व्यक्तीला म्हणतात, डार्लिंग

Web Title: Akshaye Deodhar tells us that you have lost your life in this series. This information about me is completely false.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.