याच का त्या पाठकबाई ?,अक्षया देवधरमध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 20:22 IST2021-03-15T19:30:00+5:302021-03-15T20:22:06+5:30
अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे.

याच का त्या पाठकबाई ?,अक्षया देवधरमध्ये झालेले ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते झाले थक्क
अक्षया देवधर हिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. अक्षयाने 'तुझ्यात जीव रंगला' मालिकेतून आपल्या अभिनय कौशल्याची झलक दाखवून दिली आहे. पाठक बाई म्हणून अक्षया घराघरात पोहोचली.'तुझ्यात जीव रंगला' मालिकेत पाठकबाई बनलेली अक्षया रसिकांना नेहमीच सोज्वळ रुपात पहायला मिळाली. या भूमिकेतून तिने अल्पावधीतच रसिकांची मनं जिंकली आहेत.
छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अक्षया देवधर सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. आपले विचार तसंच स्वतःचे फोटो ती आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिला सोशल मीडियावर बरेच फॅन फॉलोईंग आहे.अक्षयाने सोशल मीडिया गुलाबी रंगाच्या वनपीसमधला एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अक्षया खूपच ग्लॅमरस दिसते आहे. फोटोवर चाहते सुद्धा फिदा झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून आपण अक्षयाच्या सोशल मीडिया प्रोफाईलवर नजर टाकली तर लक्षात येते ती दिवसेंदिवस अधिकच ग्लॅमरस आणि बोल्ड होतोय. काही दिवसांपूर्वी निळ्या रंगाच्या शिमर ड्रेसमध्ये अक्षयने आपल्या बोल्ड अदा दाखवल्या होत्या.