आलिया भटने छोट्या पडद्यावर दिले 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नृत्य प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 20:00 IST2019-04-13T20:00:00+5:302019-04-13T20:00:00+5:30
‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक जबरदस्त ताकदीने गाणी सादर करीत असून आपल्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपल्यात सुधारणा घडवून आणताना दिसत आहे.

आलिया भटने छोट्या पडद्यावर दिले 'घर मोरे परदेसिया' गाण्यावर नृत्य प्रशिक्षण
स्टार प्लस वाहिनीवरील ‘द व्हॉइस’ या कार्यक्रमातील प्रत्येक स्पर्धक जबरदस्त ताकदीने गाणी सादर करीत असून आपल्या मार्गदर्शकाच्या मदतीने आपल्यात सुधारणा घडवून आणताना दिसत आहे.
अलीकडेच या कार्यक्रमात आपल्या ‘कलंक’ या आगामी चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी वरूण धवन आणि आलिया भट हे कलाकार सहभागी झाले होते. यावेळी आलिया भटने एका स्पर्धकाला या चित्रपटातील आपल्या ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर कसा डान्स करायचा याचे प्रात्यक्षिक दाखविले.
या कार्यक्रमातील एक स्पर्धक सिमरन ही आलिया भटची मोठी चाहती आहे. तिने या चित्रपटातील ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावर कसा नाच करायचा, ते दाखविण्याची विनंती आलियाला केली. आलियानेही ही विनंती तात्काळ मान्य केली आणि सिमरनची इच्छा पूर्ण केली.
आलिया म्हणाली, ‘घर मोरे परदेसिया’ या गाण्यावरील हा पदन्यास शिकण्यास मला अडीच महिने लागले. आता मी तुला हा डान्स शिकवीत असताना तुला तो लक्षात ठेवता आला, तर मला खरंच आनंद वाटेल.” हे नृत्य करताना आलिया एकदाही चुकली नाही.
आलियाच्या तालाबरोबर ताळमेळ ठेवताना या स्पर्धकाची तारांबळ उडत असली, तरी तिने प्रयत्न कायम ठेवला. आलियाच्या या कृतीने वातावरण एकदम मोकळे झाले आणि सर्वत्र उत्साह पसरला.