अलका कुबल यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2024 17:39 IST2024-04-05T17:38:39+5:302024-04-05T17:39:02+5:30
Alka Kubal : अलका कुबल लवकरच छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.

अलका कुबल यांचं छोट्या पडद्यावर कमबॅक, दिसणार या शोमध्ये
अभिनेत्री अलका कुबल (Alka Kubal) मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आतापर्यंत विविध भूमिका साकारुन रसिकांच्या मनात घर केले आहे. माहेरची साडी या चित्रपटातून त्यांना चांगलीच लोकप्रियता मिळाली. एक गुणी आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून त्या लोकांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यांचा फॅन फॉलोव्हिंग अद्याप कमी झालेला नाही. त्यांच्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. दरम्यान आता त्यांच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. लवकरच त्या छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.
हो. हे खरंय...अलका कुबल कलर्स मराठीवर सुरु होत असलेला विनोदी शो हसताय ना ?हसायलाच पाहिजे!!मध्ये पाहायला मिळणार आहेत. महाराष्ट्राचा अत्यंत लाडका विनोदाचा बादशाह डॉ. निलेश साबळे याच्याबरोबर विनोदाची सुपरफास्ट मेल घेऊन येतो आहे. यात डॉ. निलेश साबळेबरोबरचभाऊ कदम आणि ओंकार भोजने सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमाची लेखन, दिग्दर्शन, सूत्रसंचालन अशी संपूर्ण धुरा डॉ. निलेश साबळे स्वतः सांभाळणार असून यात भाऊ कदम, ओंकार भोजनेबरोबरच सुपर्णा श्याम , स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदि कलाकार त्यांना साथ देणार आहेत.
तर या कार्यक्रमात अभिनेता भरत जाधव आणि अलका कुबल आठल्ये दर भागामध्ये सेलिब्रिटी पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवायला येत असलेला ''हसताय ना ? हसायलाच पाहिजे!!' हा शो कलर्स मराठीवर २० एप्रिलपासून शनिवार - रविवार रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे.