'अल्लादिन: नाम तो सुना होगा'मध्ये अंगठीतल्या जीनीचा बगदादमधील लोकांवर ताबा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 07:51 PM2019-03-04T19:51:56+5:302019-03-04T19:52:18+5:30
सोनी सबच्या 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने आपल्या अप्रतिम आणि गुंतवून ठेवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळवले आहे.
सोनी सबच्या 'अल्लादिन: नाम तो सुना होगा' या मालिकेने आपल्या अप्रतिम आणि गुंतवून ठेवणाऱ्या पटकथेमुळे प्रेक्षकांचे प्रेम आणि कौतुक मिळवले आहे. अंगठीतला जीनी (प्रणित भट) आल्याने ही मालिका एका वरच्या पातळीवर पोहोचली आहे.
अंगठीतला जीनी, अल्लादिन (सिद्धार्थ निगम) आणि जीनू (राशुल टंडन) पहिल्यांदाच एकमेकांना सामोरे येतात. तेव्हा अंगठीतला जीनी जीनूला धमकी देतो की, अल्लादिनची साथ दिल्यास तो जीनूचे कुटुंब आणि बगदाद उद्ध्वस्त करून टाकेल. यातून तो बगदादच्या नागरिकांवर ताबा मिळवून त्यांच्यात भय निर्माण करतो. एकीकडे शहरात काहीतरी दुष्ट शक्ती असल्याची शंका संपूर्ण शहराला आहे. तर दुसरीकडे, ओमर (गिरीश सहदेव) आणि अल्लादिन जीनूला अंगठीतल्या जीनीच्या दुष्ट शक्तींपासून स्वत:चे व इतर सर्वांचे रक्षण करण्यासाठी प्रशिक्षण देत आहेत. मात्र, या सगळ्यात अम्मी (स्मिता बंसल) आणि इतरांसमोर आपली खरी ओळख स्पष्ट व्हायला नको याची चिंता जीनूला आहे. अंगठीतल्या जीनीशी लढा देणे जीनूला शक्य होणार आहे का की संपूर्ण बगदाद आणि जीनूचा नायनाट करण्यात अंगठीतल्या जीनीला यश येईल?
जीनूची भूमिका साकारणारे राशुल टंडन म्हणाले, 'अंगठीतील जीनी आपला भाऊ असल्याचे जीनूला कळते. मात्र, आता त्याने जीनूला आणि संपूर्ण बगदादला नष्ट करण्याचे आव्हान दिले आहे. आता जीनू या लढ्यासाठी तयारी करतोय. आपले कुटुंब आणि शहराला वाचवताना जीनूने दिलेला धाडसी लढा पाहणे प्रेक्षकांसाठी फार रंजक असणार आहे. अंगठीतील जीनी आणि जीनू यांच्यातील लढाई पाहताना प्रेक्षक स्क्रीन समोरून उठू शकणार नाहीत.'