गोविंदानंतर आणखी एका अभिनेत्याचा घटस्फोट? पत्नीने केला अर्ज दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 11:00 IST2025-02-26T10:58:41+5:302025-02-26T11:00:00+5:30
बॉलिवूडमध्ये चाललंय काय? गोविंदानंतर आणखी एक अभिनेता लग्नाच्या ९ वर्षानंतर घेणार घटस्फोट (aman verma)

गोविंदानंतर आणखी एका अभिनेत्याचा घटस्फोट? पत्नीने केला अर्ज दाखल
सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता गोविंदा (govinda) आणि त्याची पत्नी सुनिता (sunita ahuja) या दोघांचा ३७ वर्षांचा मोडणार असल्याच्या चर्चा सध्या सुरु आहेत. अशातच आणखी एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घटस्फोटाच्या चर्चांना उधाण आलंय. 'बागबान' सिनेमात झळकलेला आणि प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलेला लोकप्रिय अभिनेता अमन वर्मा (aman verma divorce news) लग्नाच्या ९ वर्षांनंतर घटस्फोट घेणार, अशी बातमी समोर येतेय. अमन आणि त्याच्या पत्नीच्या घटस्फोटामागचं कारणही समोर आलंय.
अमन वर्मा लग्नाच्या ९ वर्षांनंतर घेणार घटस्फोट?
अमन वर्माला आपण अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'बागबान' सिनेमात अभिनय करताना पाहिलंय. अमन वर्माच्या पत्नीने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली आहे. अमन आणि त्याची पत्नी वंदना ललवानी यांनी लग्नाच्या ९ वर्षांनंतर वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, या दोघांच्या नातेसंबंधांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून तणाव सुरु होते. त्यांनी नातं सुधारण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु अखेर त्यांनी हा निर्णय घेतला.
"अमन वर्मा आणि वंदना ललवानीच्या कुटुंबाने दोघांमधली भांडणं, तणाव मिटवण्याचा विचार केला होता. अनेक प्रयत्न करुनही दोघांमधील नातेसंबंध सुधारले नाहीत त्यामुळे दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. अमनची पत्नी वंदनाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केला." अशी माहिती समोर येतेय. अमन आणि वंदना या दोघांची पहिली भेट २०१४ मध्ये 'हमने ली है शपथ' मालिकेच्या सेटवर झाली. पुढे त्यांच्यातली मैत्री वाढली आणि दोघांनी २०१६ ला लग्न करण्याचा निर्णय घेतला. परंतु आता लग्नाच्या ९ वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आल्याने त्यांच्या चाहत्यांना धक्का बसलाय. अमनची पत्नी वंदनाही अभिनेत्री आहे.