अमन वर्माने 15 वर्षांनी लहान असलेल्या ऑनस्क्रीन बहिणीसह केले लग्न !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2016 02:09 PM2016-12-17T14:09:26+5:302016-12-17T14:09:26+5:30

होस्ट आणि अभिनेता अमन वर्मा  अखरे अडकला रेशीमगाठीत. छोट्या पडद्यावरील 'शपथ' या मालिकेत अमनच्या बहिणीची भूमिका साकारणा-या वंदना लालवाणीसह ...

Aman Verma married 15 years old onscreen sister! | अमन वर्माने 15 वर्षांनी लहान असलेल्या ऑनस्क्रीन बहिणीसह केले लग्न !

अमन वर्माने 15 वर्षांनी लहान असलेल्या ऑनस्क्रीन बहिणीसह केले लग्न !

googlenewsNext
स्ट आणि अभिनेता अमन वर्मा  अखरे अडकला रेशीमगाठीत. छोट्या पडद्यावरील 'शपथ' या मालिकेत अमनच्या बहिणीची भूमिका साकारणा-या वंदना लालवाणीसह त्याचं शुभमंगल पार पडले. अमन आणि वंदना यांचं अफेअर सुरु होतं.अमन वर्माने गर्लफ्रेंड वंदना लालवानीसोबत लग्न थाटले. मंगळवारी मुंबईत अगदी पारंपरिक पद्धतीने दोघांचे लग्न झाले. लग्नानंतर या कपलने वेडिंग रिसेप्सन पार्टी ठेवली होती. या पार्टीत त्यांच्या कुटुंबीयांसोबत नातेवाईक आणि निवडक मित्र सहभागी झाले होते. अमन आणि वंदनाची भेट 'शपथ' या मालिकेच्या सेटवर झाली होती. या मालिकेत दोघांनी बहीणभावाची भूमिका साकारली होती.अमन वर्मा आणि वंदना यांच्या वयात जवळजवळ 15 वर्षांचे अंतर आहे. अमन 45 वर्षांचा तर वंदना 31 वर्षांची आहे.हे दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते.अमन आणि वंदना यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी टीव्ही इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. आरती सिंह, उर्वशी शर्मा, डेलनाज ईरानी, रश्मी घोष, जयती भाटिया आणि अक्षय डोगरासह अनेक कलाकार लग्नात सहभागी झाले होते.




वंदना म्हणाली, आम्ही दोघांनी  लग्नासाठी दोन वर्षे वाट बघितली. आम्ही एकमेकांसाठी अगदी परफेक्ट लाईफ पार्टनर  आहोत.  माझ्या आयुष्यात मला कुटुंबानंतर कोणी चांगले ओळखले असेल मला समजून घेतले असेल तर तो दुसरा अमन आहे. त्यामुळे माझ्या लाईफ पार्टनरची जागा ही अमनपेक्षा दुसरे कोणीही घेवू शकले नसते. आम्ही दोघेही एकमेकांसाठी मेड फॉर इच अदर असेच आहोत. 



अमन म्हणाला, माझ्या मते, एखाद्याने तेव्हाच लग्न करावे, जेव्हा दोघेही मनापासून लग्नासाठी अगदी तयार असतील. माझ्या लग्नासाठी हीच योग्य वेळ होती. वंदना माझ्या आयुष्यात आल्याने मी स्वतःला नशीबवान समजतोय. आम्ही दोघेही एकमेकांना गेल्या दोन वर्षापासून ओळखतोय. त्यामुळे एकमेंकांच्या सगळ्या गोष्टी चांगल्या माहिती झाल्यात. इनफॅक्ट वंदना मला खूप समजून घेते तिनेच मला माझ्या आयुष्यात चांगली व्यक्ती बनवले आहे आणि मी ही वंदनासाठी मी पूर्ण बदललोय.



खरंतर , याचवर्षी म्हणजेच 20 एप्रिल 2016लाच त्यांचं लग्न होणार होतं. मात्र काही कारणास्तव हे लग्न पुढं ढकलण्यात आलं होतं. त्यामुळं दोघांच्या नात्याविषयी उलटसुलट चर्चा सुरु झाल्या होत्या.एका मुलाखतीदरम्यान वंदनाशी असलेल्या नात्यात कोणतीही कटूता आली नसल्याचं खुद्द अमननेच  स्पष्ट केले होते.  

Web Title: Aman Verma married 15 years old onscreen sister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.