​डान्स महाराष्ट्र डान्सच्या व्यासपीठावर अमेय वाघने सादर केली कविता

By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2018 09:09 AM2018-03-05T09:09:44+5:302018-03-05T14:41:58+5:30

डान्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि त्यांचे अफलातून असे सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मन जिंकत ...

Amey Wagh presented the dance drama on the stage of Maharashtra Dance | ​डान्स महाराष्ट्र डान्सच्या व्यासपीठावर अमेय वाघने सादर केली कविता

​डान्स महाराष्ट्र डान्सच्या व्यासपीठावर अमेय वाघने सादर केली कविता

googlenewsNext
न्स महाराष्ट्र डान्स या कार्यक्रमात सहभागी झालेले स्पर्धक आणि त्यांचे अफलातून असे सादरीकरण यामुळे हा कार्यक्रम प्रेक्षकांचे मन जिंकत आहे. डान्स महाराष्ट्र डान्स च्या कार्यक्रमामुळे अनेक उत्तम डान्सरना खूप चांगला व्यासपीठ मिळाला आहे. जगभरात ८ मार्च रोजी महिला दिन साजरा केला जातो. प्रत्येक क्षेत्रात आज महिला पुरुषांच्या बरोबरीने कार्यरत असून, आपल्या कर्तृत्त्वाने त्यांनी विविध क्षेत्रात गगनभरारीही घेतली आहे. महिलांच्या हक्कांचे रक्षण आणि स्त्री-पुरुष समानता या दृष्टीने जागतिक महिला दिनाला विशेष महत्त्व आहे. महिला दिनानिमित्त काही देशांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुटी देण्यात येते तर काही देशांमध्ये ऑफिसेसमध्ये महिला कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. महिलांनी मिळवलेल्या यशाचा, अतुलनीय कामगिरीचा आढावा घेत त्यांचे अभिनंदन आणि कौतुकही या निमित्ताने करण्यात येते. महिलांना प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्थान मिळवून देण्यासाठी प्रत्येक देशाने काही मार्गदर्शक तत्त्वे, कार्यक्रम निश्चित केले आहेत. डान्स महाराष्ट्र डान्सच्या व्यासपीठावर दोन स्पेशल एपिसोड हे महिला स्पर्धकांना गौरवण्यासाठी शूट करण्यात आले. या दोन्ही एपिसोडमध्ये केवळ महिला स्पर्धकांनी परफॉर्म केले. त्याच बरोबर या कार्यक्रमात अशा मातांचा गौरव करण्यात आला, ज्यांनी त्यांच्या मुलींना या स्पर्धेत पाठवले, त्यांना प्रोत्सहन दिले.
या दोन स्पेशल एपिसोड मध्ये अमेय वाघ डान्स महाराष्ट्र डान्सच्या व्यासपीठावर महिला स्पर्धकांना प्रोत्साहन देताना दिसेल. या एपिसोडमध्ये अमेय वाघने महिला दिनाचे महत्त्व सांगताना आईवर एक कविता केली तर या कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात झी युवावरील मालिकांमधील हृता दुर्गुळे (वैदेही - फुलपाखरू), कौमुदी वालोकर (कुहू - देवाशप्पथ),  पल्लवी पाटील (निशा - बापमाणूस) आणि अश्विनी कासार (पूर्वा - कट्टी बट्टी) या अभिनेत्रींनी स्पर्धकांबरोबर धमाल केली. त्यांनी या महिला स्पर्धकांना केवळ प्रोत्साहनच नाही दिले तर त्यांनी या सर्वांबरोबर दिलखुलास डान्स सुद्धा केला. ७, ८ आणि ९ मार्चला प्रेक्षकांना डान्स महाराष्ट्र डान्सचे हे विशेष भाग पाहायला मिळणार आहेत.

Also Read : ​कलाकार रंगले होळीच्या रंगात

Web Title: Amey Wagh presented the dance drama on the stage of Maharashtra Dance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.